मुंबई - 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये अपशब्द वापरल्याबद्दल अडचणीत सापडलेले युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया, समय रैना, आशिष चंचलानी, अपूर्व मखीजा आणि इतरांच्या अडचणी वाढत झाली आहे. अश्लील विनोद प्रकरणात जयपूरमध्ये रणवीर अलाहाबादिया, समय रैना, आशिष चंचलानी, अपूर्व मखीजा आणि इतरांविरुद्धही गुन्हा दाखल केला गेला आहे. बीएनएस कायदा, आयटी कायदा आणि इतर कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी महाराष्ट्र सायबर सेलनं समय रैनाला दोनदा समन्स पाठवले आहेत. समयला 17 फेब्रुवारी रोजी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.
रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना अडचणीत : तसेच यानंतर समय रैनाच्या वकिलानं सायबर सेलला सांगितलं होतं की, समय रैना अमेरिकेत आहे आणि 17 मार्च रोजी देशात परतेल. यानंतर सायबर सेलनं रैनाला 18 फेब्रुवारीपर्यंत हजर राहण्याचे निर्देश दिले. दरम्यान याप्रकरणी 11 फेब्रुवारी रोजी वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शोच्या सर्व भागांमध्ये भूमिका बजावणाऱ्या सर्व सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर सर्व व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश दिले गेले होते. चौकशी पूर्ण होईपर्यंत शोचे अकाउंट निष्क्रिय करण्यात आले होते. सायबर अधिकाऱ्यांनी सुरुवातीला पहिला वादग्रस्त व्हिडिओ काढून टाकला.
सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी : आता याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात 18 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. प्रचंड विरोधानंतर, रणवीर अलाहबादियानं अनेकदा याबद्दल माफी मागितली आहे. यामध्ये त्यानं म्हटलं होतं, "माझी टिप्पणी फक्त अयोग्य नव्हती, ती मजेदारही नव्हती. विनोद हे माझे वैशिष्ट्य नाही, मी फक्त माफी मागण्यासाठी येथे आहे." याशिवाय समयनं या प्रकरणी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजद्वारे लिहिलं होतं, 'जे काही घडत आहे ते माझ्यासाठी खूप जास्त आहे. मी माझ्या चॅनलवरून 'इंडियाज गॉट लेटेंट'चे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत. माझा एकमेव उद्देश लोकांना हसवणे आणि चांगला वेळ घालवणे हा होता. याबद्दल चौकशी निष्पक्षपणे पूर्ण व्हाव्यात यासाठी मी सर्व एजन्सींना पूर्ण सहकार्य करेन. धन्यवाद." आता देखील रणवीर आणि समयबद्दल सोशल मीडियावर अनेकजण चर्चा करत आहेत.
हेही वाचा :
- जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर रणवीर अलाहाबादियानं पुन्हा मागितली माफी, कुटुंबाबद्दल केली चिंता व्यक्त...
- रणवीर अलाहाबादिया वादग्रस्त विधानानंतर पुन्हा जबाब नोंदविण्यासाठी अपूर्वा मुखीजा मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये हजर...
- मुंबई पोलीस आणि राष्ट्रीय महिला आयोगानं रणवीर अलाहाबादिया -समय रैनानंतर 30 लोकांना समन्स बजावला...