मुंबई - विराट कोहलीनं 24 नोव्हेंबर रोजी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात 30 वं शतक झळकावून इतिहास रचला. त्यानंतर विराटनं अनुष्काला मैदानातून फ्लाइंग किस दिला जो दिवसाचा खास क्षण ठरला. पण मैदानावर आणखी एक गोष्ट घडली ज्यानं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं गेलं. या दरम्यान आणखी एक खास गोष्ट घडल्याचं सोशल मीडियावर झळकलं, ते म्हणजे यावेळी मैदानात अनुष्का आणि विराटचा मुलगा अकाय याचा चेहरा पहिल्यांदा दिसला. त्यानंतर सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला. या फोटोतील मुलाला सर्वजण विरुष्काचा मुलगा समजत होतं. पण ही गोष्ट खरी नव्हती, असा खुलासा खुद्द विराटच्या बहिणीनेच केला आहे.
अलीकडेच, विराट कोहलीची बहीण भावना कोहली धिंग्राने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि सांगितलं की प्रत्येकाचा गैरसमज झाला आहे. तिनं लिहिलं की, "मी सोशल मीडियावर पाहिलं की सर्वजण अनुष्का आणि विराटच्या मित्राच्या मुलीला त्यांचा मुलगा मसजत आहेत. परंतु तो आमचा अकाय नाही. धन्यवाद".
Akaay Kohli Face Reveal During India Vs Australia Test Match !!
— Fardeen_jaani777 (@JaaniFc) November 24, 2024
•#akaay #akaaykohli #Kohli #ViratKohli #INDvAUS #AUSvIND #BGT #bordergavaskartrophy2024 !! pic.twitter.com/sijugvHu9w
काय प्रकरण आहे ? - 24 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात कसोटी सामना होता, तिथे अनुष्का शर्माही पोहोचली होती. 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा पहिला सामना ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे खेळला जात आहे. कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. गेल्या रविवारी झालेल्या सामन्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये विराटनं शतक झळकावलं आणि अनुष्काला असे फ्लाइंग किस दिलं. या फोटोंमध्ये अनुष्का विराट कोहलीला चिअर करताना दिसत आहे. दरम्यान, लोकांना त्यांच्या मागे एक व्यक्ती दिसते, त्यानं एका मुलाला आपल्या मांडीवर घेतलं होतं. हे मूल अनुष्का-विराट कोहली यांचा मुलगा अकाय असल्याचे सांगण्यात येत होतं. यानंतर सोशल मीडियावर एक वाद सुरू झाला आणि लोक त्याच्या गोपनियतेचा भंग झाल्याचं बोलू लागले. तर अनेक लोक अकायच्या पहिल्या दर्शनामुळे उत्साहित झाले होते, मात्र आता तो अकाय नसून अनुष्का आणि विराटच्या मित्राचे बाळ असल्याचं स्पष्ट झालं आहे.