ETV Bharat / politics

धनंजय मुंडेंवर टीका करताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली, वाद पेटणार? - Vijay Wadettiwar - VIJAY WADETTIWAR

Vijay Wadettiwar On Dhananjay Munde : शेतकऱ्यांच्या समस्येवर बोलत असताना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. मात्र, यावेळी मुंडेंवर टीका करत असताना वडेट्टीवारांची जीभ घसरली. त्यामुळं आता या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Vijay Wadettiwar controversial statement against Dhananjay Munde
विजय वडेट्टीवार आणि धनंजय मुंडे (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 2:44 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Vijay Wadettiwar On Dhananjay Munde : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटात सोडून कृषी मंत्री परदेशात जातात कसे, तुम्ही XX मारायला मंत्री झालाय का? अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली. "बियाणी मिळत नाहीत, शेतकरी एवढ्या उन्हात रांगा लावतोय. घामानं हैराण झालाय, शेतकऱ्यावर इतकी संकटं असताना हे बाहेर जातात कसे असा प्रश्न मला पडतो. तुमच्या विभागीय बैठकीला मंत्री उपस्थित राहणार नाही. मग काय तुम्ही XX मारायला मंत्री झाला का? फक्त टक्केवारी घेण्यात तुम्ही व्यग्र आहात. तुम्हाला जेवढं लुटायचं तेवढं लुटा", असं वडेट्टीवार म्हणालेत. त्यामुळं वडेट्टीवारांच्या या टीकेला आता धनंजय मुंडे काय उत्तर देतील? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

विजय वडेट्टीवार पत्रकार परिषद (reporter)

जितेंद्र आव्हाड यांच्याकडून चूक पण... : पुढं बोलत असताना वडेट्टीवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला मानणारा माणूस म्हणजे जितेंद्र आव्हाड आहे. चुकीला माफी नाही म्हणत त्यांनी स्वत:ची चूक सर्वांसमोर मान्य देखील केलीय. मात्र, आता मनुस्मृती मानणारा भाजपा त्याचं भांडवल करतंय. बाबासाहेबांचा सन्मान यांच्या मनात आहे का?, असा सवाल त्यांनी केला. तसंच पोटात एक आणि ओठात एक अशी भाजपाची भूमिका असल्याचंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

पुण्यातील घटनेवर बोलताना : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणासंदर्भात बोलत असताना ते म्हणाले की, "घटना घडल्यानंतर आठ तास गुन्हा दाखल होत नाही. रक्ताचे नमुने बदलले जातात, हे सगळं आपण बघितलं. तसंच पोलीस आणि आरोग्य विभाग कुठल्यातरी राजकीय दबावाला बळी पडतोय. मग या प्रकरणातील सत्यता काय? हा खरा प्रश्न आहे. डॉ. अजय तावरेला निलंबित करा म्हणून तत्कालीन वैद्यकीय संचालक म्हैसेकर यांनी प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यानंतर त्यांचा बदलीचा प्रस्ताव मंत्रालयात गेला. गेल्या दहा वर्षांपासून अजय तावरेची बदली झालेली नाही. याचाच अर्थ त्याला कुणाचा तरी राजाश्रय आहे असा होतो.

मराठवाड्यात भीषण दुष्काळ : "मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पंचनामे होतात मात्र शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. मराठवाड्यात शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम झालंय. संभाजीनगरमध्ये 1561 गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात झाल्यात. 267 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलय. अनेक भागात 15-15 दिवस पिण्याचं पाणी मिळत नाही. उद्या नाना पटोले हे देखील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. जालना जिल्ह्यातील जवखेडा गावातमधील कुंभार समाजाच्या कुटुंबासाठी मी मुद्दाम आलोय. बँकेचा कर्मचारी शेतकऱ्याला कर्ज मिळवण्यासाठी लाच मागतो, हे दुर्दैव आहे", असं वडेट्टीवार म्हणाले.

टक्केवारी घेणारे सरकार : पुढं ते म्हणाले, "हे सरकार फक्त टक्केवारी आणि टेंडर घेण्यामध्येच व्यग्र आहे. त्यांनी निवडणुकीचं आणि आचारसंहितेचं कारण सांगून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम केलं. दुसरीकडं मात्र निवडणूक आयोगाकडं परवानगी मागून 25,000 कोटीचं टेंडर काढलं. यांनी निवडणूक आयोगाकडं शेतकऱ्यांसाठी परवानगी मागितली असती तर नक्कीच मिळाली असती. मात्र, यांना मदत करायची नाही. गेल्या चार महिन्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला, गारपीट झाली, विशेष करून यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं."

आमच्या जाहीरनाम्यात शेतकरी मदत : "या सरकारनं शेतकऱ्यांना सांगितलं हमीभाव देऊ, एमएसपी देऊ, मात्र काही दिलं नाही. अशातच खरीप हंगाम सुरू झाला. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही स्पष्टपणे उल्लेख केलाय की, आमचं सरकार आलं तर आम्ही देशातील सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. राज्य सरकारला आमची मागणी आहे की या शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ करावं. त्यांना मोफत बियाणं द्यावं, वीज बिल माफ करावं, आणि जी कर्जवसुली सुरू आहे तिला स्थगिती द्यावी. आज जनावरांना चारा नाही, पाणी नाही त्यामुळं सर्व जनावरांना सरकारनं चारा-पाणी उपलब्ध करून द्यावं." तसंच पिण्याच्या पाण्यासाठी जनता टाहो फोडत असताना सुद्धा टक्केवारी घेण्याचं काम या नतदृष्टांकडून होत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

दानवे यांनी जमिनी बळकावल्या : पुढं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर हल्लाबोल करत वडेट्टीवार म्हणाले की, लोकांच्या जमिनी बळकावण्याची ज्यांना हाव आहे, अशा केंद्रीय मंत्र्यांनी भोकरदन तालुक्यातील एका कुंभार कुटुंबीयांची जमीन बळकावली. तसंच त्यांची घरं पाडली. मात्र, या कुटुंबाला न्याय देण्यासाठी त्यांचा मुद्दा आम्ही विधानसभेत गाजवू, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.

हेही वाचा -

  1. पुणे हिट अँड रन प्रकरण: डॉ.अजय तावरे यांचं निलंबन नव्हे तर त्यांना फासावर लटकवा - विजय वडेट्टीवार - Pune Hit And Run Case
  2. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा पोलिसांवर हल्लाबोल - Vijay Wadettiwar On Pune Police
  3. पुण्यातील अपघातावरून तापलं राजकारण, न्यायालयीन चौकशी करण्याची विरोधी पक्षनेत्यांची मागणी - Pune hit and run case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.