सातारा Udayanraje Challenge to Sharad Pawar : एपीएमसी शौचालय घोटाळ्यावरुन उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका केलीय. "यशवंतरावांचे विचार सांगणाऱ्यांना आता काही काम उरलेलं नाही. या मानसपुत्रानं माझ्या विरोधात जिल्ह्यात चार नव्हे चाळीस सभा घ्याव्यात," असं थेट आव्हान उदयनराजेंनी शरद पवारांना दिलंय. शरद पवारांवर टीका करताना उदयनराजे म्हणाले, "यशवंतरावांच्या मानसपुत्राच्या पक्षाला कोकण, विदर्भ, खानदेशात जनाधार उरलेला नाही. त्यांचा पक्ष पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यापुरता मर्यादीत राहिला आहे. त्यांना आता काही काम उरलेलं नाही."
पापाचा वाटेकरी व्हायचं नव्हतं म्हणून राजीनामा दिला : "शशिकांत शिंदे यांच्या कर्मामुळंच त्यांच्यावर ही वेळ आलीय. शरद पवारांना 18 लाख लोकांमध्ये एकही चारित्र्य संपन्न उमेदवार मिळाला नाही, हे दुर्दैव आहे, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांच्या संभाव्य अटकेवर प्रतिक्रिया दिलीय. घोटाळेबहाद्दरांच्या बरोबर काम करुन मला पापाचा वाटेकरी व्हायचं नव्हतं. म्हणून 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मी राजीनामा दिला," असं उदयनराजेंनी प्रचार सभेत सांगितल.
निवडणूक हातातून गेल्यामुळंच भ्रष्टाचाराचे आरोप : नवी मुंबई बाजार समितीतील शौचालय घोटाळ्यावरुन साताऱ्यातील महाविकास आघाडीचे (शरद पवार गट) उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या संभाव्य अटकेची शक्यता वर्तवली जातेय. यावर साताऱ्याची निवडणूक महायुतीच्या हातून गेल्यामुळंच भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले जात असल्याची प्रतिक्रिया शशिकांत शिदेंनी दिलीय. तसंच येत्या 7 मे रोजी मतदान झालं की 8 किंवा 9 तारखेला नवी मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर उपोषणाला बसून सत्य लोकांसमोर आणणार असल्याचा इशारा शशिकांत शिंदेंनी दिलाय. "सत्य लोकांच्या समोर यावं. मी दोषी असल्याचं सिद्ध झाल्यास अटकही स्वीकारेन. पण, घटनेत सत्य नसताना उमेदवाराची प्रतिमा मलीन करण्यासाठी खटाटोप सुरू आहे," असा त्यांनी आरोप केलाय.
हेही वाचा :