ETV Bharat / politics

ऑडी हिट अँड रन प्रकरण; सुषमा अंधारे यांनी केला पोलिसांचा 'पंचनामा', संकेत बावनकुळेला सोडल्याचा आरोप - Audi Hit and Run Case - AUDI HIT AND RUN CASE

Audi Hit and Run Case : नागपुरातील ऑडी कार हिट अँड रन अपघात प्रकरणावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे अक्रमक झाल्या आहेत. यांनी सीताबर्डी पोलीस (Sitabuldi Police) स्टेशनचे निरीक्षक अपघात प्रकरणात लपवाछपवी करत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संकेत बावनकुळे याला कसा वाचवण्याचा प्रयत्न केला याचाच पंचनामा केला.

Audi Hit and Run Case
सुषमा अंधारे (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2024, 9:45 PM IST

नागपूर Audi Hit and Run Case : ऑडी हिट अँड रन प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पहिल्या दिवसापासून प्रकरण लावून धरलं असताना, आज त्यांनी थेट नागपूरच्या सीताबर्डी पोलीस (Sitabuldi Police) ठाण्यात जाऊन सर्व हकीकत जाणून घेतली. सीताबर्डी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अपघात प्रकरणात लपवाछपवी करत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. जर फडणवीस यांना खरंच निरपेक्ष चौकशी करायची असेल तर संकेत बावनकुळेचं नाव आरोपी म्हणून एफआयआरमध्ये समाविष्ट करावं अशी मागणी त्यांनी केलीय.

संकेतने बीफ खाल्ले... : फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे दबावात आहे. त्यांच्या जीविताला धोका असल्यानं जितेंद्र सोनकांबळे यांना पोलीस संरक्षण द्यायला हवं अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केलाय. हिंदुत्व मिरवणाऱ्या या लोकांना माहिती हवं की, भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या मुलाने बीफ खाल्लं असं सांगून अंधारे यांनी हे प्रकरण वेगळ्याच वळणावर आणलं.

प्रतिक्रिया देताना उपनेत्या सुषमा अंधारे (ETV BHARAT Reporter)

अपघातानंतर आता बीफ पॉलिटिक्स : ज्या ऑडी कारने अनेकांना धडक दिली त्या कारमध्ये तिघे होते. अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार आणि संकेत बावनकुळे हे कारमध्ये बसले होते. त्यापूर्वी अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार, संकेत बावनकुळे आणि एक मित्रानं लाहोरी बारमध्ये बीफ कटलेटची ऑर्डर दिली होती असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. सीताबर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर चकाटे काहीतरी लपवत असल्याचंही त्या म्हणाल्या.

संकेतची वैद्यकीय चाचणी का केली नाही : ऑडी कार अपघाताच्या घटनेचा सुषमा अंधारेंनी आज नागपुरात येऊन आढावा घेतला. सुषमा अंधारे यांनी आत्तापर्यंत झालेल्या तपासावरचं प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑडीमध्ये संकेत बावनकुळे होता तर संकेत बावनकुळेचं मेडिकल का करण्यात आलं नाही. अपघतानंतर लगेच संकेत बावनकुळेची ऑडी कार गॅरेजमध्ये कशी गेली. गाडीच्या नंबरची एफआयआरमध्ये नोंद का करण्यात आली नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

संकेतला लोकांनी चोपले : बारमधून निघाल्यानंतर संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांनी १५० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गाडी पळवायला सुरुवात केली. सर्वप्रथम मानकापूरमध्ये पहिली धडक दिली. त्या ठिकाणी काही लोकांनी संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांना चोप दिला असा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय. पोलीस निरीक्षक चकाटे आणि उपायुक्त राहुल मदने काहीतरी लपवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच चंद्रशेखर बावनकुळे स्वतः साळसूद असल्याचा आव आणत असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला.

अंधारे यांनी उपस्थित केलेले मुद्दे -

1) संकेत बावनकुळे लाहोरी बारमध्ये मसाला दूध पिला असेल तरी त्याने गाडी दारू पिणाऱ्याला का दिली?
2) संकेत गाडी चालवत नव्हता, तर सलमान खान केसमध्ये गाडी चालवणारा व्यक्ती दोषी कसा.
3) काँग्रेस आमदार विकास ठाकरेंनी संस्कार वर्ग काढावे.
4) एका हॉटेल मालकाने नागपुरात त्याच्या कथित प्रेयसीची हत्या करून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्दिष्टाने पुरला आहे. नागपुरात हे सर्व होत असताना फडणवीस तुम्ही राजीनामा देऊ नका अजून 5 - 50 मरू द्या.
5) संकेत बावनकुळे यांचे नाव आरोपी म्हणून समाविष्ट करावे, नाही तर मी कायदेशीर कारवाईसाठी पुढे जाईन.
6) गाडीचे डिटेल्स FIR मध्ये का नाही?
7) Spot पंचनामा का नाही?
8) कार गॅरेजमध्ये का नेली? त्याचे व्हिडिओ मी ट्विट केले.
9) फिर्यादी जितेंद्र सोनकांबळेच्या जिवाला धोका आहे. त्याला सुरक्षा द्या.
10) गाडीची नेमप्लेट कोणी काढली.
11) त्यांनी बीफ कटलेट खाल्ले आहे. ते मेडिकल रिपोर्टमध्ये येईल.

हेही वाचा -

  1. अपघातावेळी ऑडीमध्ये कोण होतं? अखेर नागपूर पोलिसांनी केला खुलासा - Audi Hit and Run Case
  2. भाजपाच्या राज्यातील बड्या नेत्याच्या लेकाचा 'कार'नामा; 'ऑडी'नं अनेक गाड्यांना उडवलं, वडील म्हणतात... - Nagpur Car Accident

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.