ETV Bharat / politics

शिरूर लोकसभा मतदार संघात रंगणार तिरंगी लढत; जागा वाटपाच्या शक्यतेवरून संभाव्य उमेदवारांची जोरदार चर्चा सुरू - Shirur Lok Sabha Constituency

Shirur Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केलीय. महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू झालीय. पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभेकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमी शिरूर लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

shirur lok sabha constituency
शिरूर लोकसभा मतदार संघात रंगणार तिरंगी लढत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 3:12 PM IST

Updated : Feb 21, 2024, 3:39 PM IST

पुणे Shirur Lok Sabha Constituency : शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वच पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात असून संभाव्य उमेदवारांची चाचपणी चालू आहे. यासाठी सर्वच दिग्गज नेते शिरूरचा दौरा करत आहेत. सध्या ही जागा मूळ राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ताब्यात आहे. भाजपा-शिंदेच्या शिवसेनेशी घरोबा केलेल्या अजित पवार गटानं महायुतीतून या मतदारसंघावर उमेदवारीचा दावा सांगितला आहे. तसेच भाजपा उमेदवारदेखील ‘शिरूर लोकसभा ’ लढण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसून येत आहे.

नेमका उमेदवार कोण ? राज्यातील प्रमुख लढतींपैकी महाराष्ट्रातील राजकीयदृष्या रंगतदार लढत म्हणून शिरुर लोकसभा मतदारसंघाकडं पाहिलं जातंय. पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभेच्या जागेवर शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे हे आपला उमेदवार उतरविणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच भर म्हणजे भाजपादेखील या लोकसभेच्या शर्यतीत उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुती (भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी) आणि महाआघाडी (शरद पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस) यांच्यामधून नेमका उमेदवार कोण असणार, याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

शिवसेना एकनाथ शिंदेच्या वाटेला शिरूर मतदार संघ गेला तर : गेल्या वर्षभरात राज्यात सत्तेत झालेल्या परिवर्तनामुळं राज्यातल्या राजकारणात मोठे बदल झाला. तसेच आगामी निवडणुकीत अनेक बदल होणार आहेत. शिरूर लोकसभा उमेदवारीसाठी अनेकांच्या नावाची चर्चा सुरू आहे. शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी पुन्हा खासदार होण्यासाठी कंबर कसली आहे. नुकतीच त्यांच्यावर म्हाडाच्या अध्यक्ष पदाचीदेखील जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र यानंतरही शिवाजी आढळराव पाटील हे लोकसभा लढविण्यास इच्छुक आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील हे 15 वर्ष या मतदार संघाचे खासदार राहिले आहेत. 2019 लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव झाला होता. मात्र, 2024 लोकसभेच्या निवडणुकीत शिवाजी आढळराव पुन्हा उतरणार असल्याचं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे. अशातच शिरूर लोकसभा क्षेत्रात शरद पवार आणि अजित पवार गटाचे दौरे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेला शिरूर मतदार संघ गेला तर : दुसरीकडं खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुक लढवणार असल्याची चर्चा आहे. मूळचे शिवसेनेचे अमोल कोल्हे यांनी 2019 च्या लोकसभेपूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांनी शिवसेनेच्याच उमेदवाराचा पराभव करत संसद भवन गाठलं. आता परत खासदार अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभेसाठी रिंगणात उतरणार आहेत. मात्र 2024 ची लोकसभा ही अमोल कोल्हे यांच्यासाठी कठीण असणार आहे. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) उमेदवार रिंगणार उतरवणार असल्याचं सांगितलं आहे. त्यातच अनेकदा अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पाडणार असल्याचंही म्हटलं आहे. अमोल कोल्हे हे एकाचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, अजित पवार गट आणि भाजपा या तिन्ही डगरीवर पाय ठेऊन आहेत.

राष्ट्रवादी अजित पवारच्या वाटेला शिरूर मतदार संघ गेला तर : शिरूर लोकसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडं गेला तर त्या गटाकडं सहकारमंत्री दिलीप वळसे आणि आमदार दिलीप मोहिते हे दोन उमेदवार आहेत. या दोघांपैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. दुसरीकडं पार्थ पवार यांना शिरूरच्या लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांमध्ये सुनेत्रा पवार यांनी शिरूर मतदार संघात अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला. पार्थ यांच्या प्रचारासाठीच सुनेत्रा पवार या शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरत असल्याचं बोललं जातय.

भाजपाच्या वाटेला शिरूर मतदार संघ गेला तर : भाजपाच्या वाट्याला हा मतदारसंघ गेला तर भोसरीचे आमदार महेश लांडगे हे भाजपाचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढविण्याची दाट शक्यता आहे. लांडगे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे लढले तर आढळराव अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. खासदार अमोल कोल्हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि आमदार महेश लांडगे अशी दुरंगी लढत झाली तर ती चांगलीच अटीतटीची निवडणूक होऊ शकते.

2019 चं शिरूर लोकसभेच चित्र : शिरुर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. येथे यंदा 59.46 टक्के मतदानाची नोंद झाली होती.शिरूर लोकसभेसाठी मुख्य लढत शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांच्यात झाली होती. 2019 लोकसभा निवडणुकीत शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे 58,483 मतांनी विजयी झाले आहेत. शिवसेनेतून आलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने मैदानात उतरवलं होत. शिरूरमध्ये अमोल कोल्हे निवडून यायचं एकच कारण आहे, ते म्हणजे त्यांची स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेनं मिळालेली लोकप्रियता आहे. या मालिकेनं अमोल कोल्हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले. याच प्रसिद्धीचा फायदा त्यांना शिरूरमध्ये झाला. जातीच्या आधारावर मतांचं चित्र बदलेलं असं शिवाजीराव आढळराव पाटील यांना वाटलं होतं. मात्र तसं काही घडलं नाही.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे विजयी : 2019 मधील शिरुर लोकसभा मतदारसंघात एकूण 21 लाख 20 हजार 988 मतदारांपैकी 12 लाख 92 हजार 381 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. भोसरी विधानसभा आणि हसपसर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं होत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. अमोल रामसिंग कोल्हे 6,34,554 मते मिळवून विजयी झाले होते. शिवसेना पक्षाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना 6,42,828 मते मिळवून विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निकम देवदत्त जयवंत यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

शेतकऱ्यांचे प्रश्न म्हत्त्वाचे : शिरुर लोकसभा क्षेत्रामधील पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी, पुणे-अहमदनगर, पुणे-सोलापूर या महामार्गावरील वाहतूक कोंडी, विमानतळ प्राधिकरण यांच्या अहवालानं खेड तालुक्यातील बहुचर्चित असं खेडचे विमानतळ गेल्यानं, हा सुद्धा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. सर्वात महत्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला बैलगाडा शर्यतबंदी तसेच अनेक मुद्दे घेऊन उमेदवार मतदारांसमोर गेले होते.

2009 मध्ये शिरूर लोकसभा अस्तित्वात : 2009 मध्ये नव्यानं अस्तित्वात आलेल्या शिरूर मतदारसंघात पहिल्यांदाच निवडणूक झाली. पुणे लगतचा परिसर आणि जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा या मतदारसंघात समावेश होत असल्यानं हा मतदारसंघ प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचा ठरला. सहा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश होतो. जुन्नर, आंबेगाव, खेड, भोसरी, हडपसर, शिरूर या विधानसभा मिळून शिरूर लोकसभा क्षेत्र बनला आहे. शिवाजीराव आढळराव दोन वेळेस येथून निवडून आले होते.

जोरदार रस्सीखेच सुरू : भाजपा, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट यांची सध्या युती असली तरी, या जागेसाठी तिन्ही पक्ष इच्छुक आहेत. जागावाटपात या मतदारसंघासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ऐनवेळी ‘शिरूर’ मतदारसंघ कुणाकडं जाईल आणि कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून किंवा गटाकडून निवडणूक लढवेल, हे सांगणे आता तरी कठीण दिसत आहे. अजित पवार यांनी जर उमेदवार रिंगणात उतरविला तर भाजपा आणि शिवसेना हे सहन करतील का? भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचा उमेदवार रिंगणात उतरला तर इतर सहकारी पक्ष सहन करेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यावरच महायुतीचे भविष्य ठरणार आहे. तर दुसरीकडं महाविकास आघाडीतर्फे किंवा शरद पवार यांच्याकडून कोणता उमेदवार रिंगणात उतरण्यात येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा -

  1. शिरुरची जागा कुणाची? अमोल कोल्हे यांचं आढळराव पाटलांना ओपन चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?
  2. पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती; तरीही लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम
  3. MNS Lok Sabha Preparation: इंजिन लोकसभा निवडणुकीच्या मैदानात.. अमित ठाकरेंसह मनसे नेत्यांच्या 'या' मतदारसंघात नियुक्त्या

Last Updated : Feb 21, 2024, 3:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.