ETV Bharat / politics

बालेकिल्ले कोणाचे नसतात, बालेकिल्ले सर्वसामान्य जनता ठरवते; राजन विचारे यांचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : ठाणे लोकसभा मतदार संघातील निवडणुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या प्रतिष्ठेची मानली जाते. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या गडातच प्रचार रॅली काढली.

Rajan Vichare
राजन विचारे (Maharashtra Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 10:59 PM IST

प्रतिक्रिया देताना राजन विचारे (Reporter Manoj Devkar)

ठाणे Lok Sabha Election 2024 : 'गड किल्ले हे कोणाचे नसतात, गड किल्ले हे सर्वसामान्य नागरिकांचे असतात'. मतदार हे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवाराला संधी देतात, असं सांगत राजन विचारे (Rajan Vichare) यांनी सांगितल. राजन विचारे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या गडातच 15 किलोमीटर पायी जाऊन प्रचार केला. यावेळी विचारे यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) लक्ष केलं.

मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात प्रचार रॅली : महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज संपूर्ण ठाणे शहरात फिरून मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात दौरा केला. मतदारांना मतदान करण्याचा आवाहन केलं. या रॅलीमध्ये विशेषता त्यांनी कोपरी या एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात लक्ष केंद्रित केलं होतं. दुपारनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या किसन नगर भागामध्ये प्रचार रॅली केली. वारं फिरलय केंद्रीय मंत्री महाराष्ट्रातले मंत्री यांनी येऊन या ठाण्याच्या परिसरामध्ये काहीही उपयोग होणार नाही, असं सांगत एकनाथ शिंदे यांच्या परिसरामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केला. यावेळी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राजन विचारे यांच्यासोबत प्रचार करत होते. जागोजागी त्यांचे सत्कार होत होते. या परिसरात त्यांनी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत सर्वसामान्य नागरिकांना मतदान करण्याचा साद घातलेली आहे.

मी केलेल्या कामाच्या जीवावर निवडून येणार : मी दोन वेळा कामाच्या जीवावरच निवडून आलो आहे. मला महाविकास आघाडीची साथ आहे. त्यामुळं कोणी कितीही सांगितलं तरीही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादानं मला ठाणेकर जनता पुन्हा एकदा संधी देतील असा ठाम विश्वास, राजन विचारे यांनी वक्त केलाय. नवी मुंबई मिरा भाईंदर या परिसराचा विकास झाला आहे. आणखी विकास करण्यासाठी मला संधी मिळेल असा आत्मविश्वास विचारे यांनी वक्त केला आहे.

हेही वाचा -

  1. महायुतीसाठी राज ठाकरेंची पहिली सभा; उद्धव ठाकरेंवर निशाणा, नारायण राणेंचं कौतुक - Raj Thackeray Sabha
  2. सेक्स स्कँडल प्रकरणात एचडी रेवन्नाला एसआयटीनं घेतलं ताब्यात, प्रज्वलविरोधात इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस - Prajwal Revanna sex scandal
  3. काँग्रेसचा मोठा मासा भाजपाच्या गळाला; अरविंदर सिंह लवलींच्या हातात 'कमळ' - Arvinder Singh Lovely joins BJP

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.