नागपूर Pratibha Dhanorkar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar Vs Vijay Wadettiwar) यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी सुरू असलेली रस्सीखेचं अखेर संपली आहे. आमदार प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूर मतदारसंघातून (Chandrapur Lok Sabha) उमेदवारी मिळाल्यानंतर आज त्या नागपूरला परतल्या आहेत. यावेळी त्या भावनिक झाल्याचं दिसून आल्या. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींपैकी अनेक नेत्यांची नावे घेतली. मात्र, विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचं नाव घेण्याचं टाळलं.
जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार : पती दिवंगत खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांना देखील तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. १० महिन्यांपूर्वी त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी ही जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार असल्याचं त्या म्हणाल्या.
मुनगंटीवार विरोधात माझी लढाई सोपी नाही : माझ्यासमोर सुधीर मुनगंटीवार हे उमेदवार म्हणून आहेत. ते महाराष्ट्रातील राजकारणातील दिग्गज नेते आहेत. राजकारणात त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यामुळं माझी लढाई मुळीच सोपी नाही. ही लढाई माझ्यासाठी लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी असणार आहे. संघर्षच्या काळात माझं एक स्टेटस आहे. संघर्ष जितका मोठा असेल तेवढाच मोठा विजय असेल.
माझी लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची : काँग्रेस पक्ष हुकूमशाहीनं चालणारा नाही, 'राजा बोले दाढी हले' असा कारभार आमच्या पक्षात होत नाही. हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा पक्ष आहे. संविधानात लोकशाहीमध्ये स्वातंत्र अधिकार आहे. त्या अधिकारामुळं जर कोणी दावेदारी केली असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. आमची लढाई ही हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे. त्याचबरोबर संविधान वाचवण्यासाठी लढाई आहे. त्यामुळं सर्व आमच्या सोबत येतील, असा विश्वास धानोरकर यांनी व्यक्त केला.
विजय वडेट्टीवार यांना निमंत्रण देणार : काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण आहेत. आमचा पक्ष लोकशाहीनं चालणार आहे. यावेळी मला जरी उमेदवारी मिळाली आहे तरी पक्षाच्या आदेशाने सर्व नेते प्रचारात सहभागी होतील. विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना मी उमेदवारी अर्ज दाखल करताना निमंत्रण देणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
प्रतिभा धानोरकर झाल्या भावनिक : बाळू धानोरकर गेल्यानंतरच्या दहा महिन्याच्या कार्यकाळात मी संघर्ष करत आहे. एवढ्या संघर्षानंतर मला तिकीट मिळालं आहे. मला दोन मुलं आहेत. माझ्या ठिकाणी कुणीही असतं तरी डोळ्यात अश्रू आले असते. त्याची उणीव मला कायम जाणवणार आहे. तिकीट मिळाल्यानंतर प्रतिभा धानोरकर पहिल्यांदा नागपुरात आल्या. यावेळी प्रतिक्रिया देताना त्या भावूक झाल्या.
हेही वाचा -
- "हे असेच लोक आहेत, जिकडे"... महायुतीत जाणाऱ्या महादेव जानकरांना संजय राऊतांचा टोला - Sanjay Raut on BJP
- असाही योगायोग; प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपुरातून उमेदवारी; आजच्याच दिवशी बाळू धानोरकर यांना मिळाली होती उमेदवारी - Pratibha Dhanorkar
- महादेव जानकरांचा 'रासप' महायुतीत सामील; जानकरांना कुठली एक जागा मिळणार? - Mahadev Jankar