ETV Bharat / politics

"ईव्हीएम अन् मोबाईलचा संबंध..."; ईव्हीएम हॅकिंगवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण - Ravindra Waikar VS Amol Kirtikar

EVM Hacking : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला (Lok Sabha Election Results 2024) दोन आठवडे झाले. मात्र, अद्यापही अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) विरुद्ध रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यामधील निकालाचा तसेच ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी (Vandana Suryavanshi) यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय.

EVM Hacking
ईव्हीएम हॅक प्रकरण (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 16, 2024, 9:10 PM IST

मुंबई EVM Hacking : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत चूरस पाहायला मिळाली होती. अवघ्या 48 मतांनी शिवसेनेचे रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांचा पराभव केला होता. मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार अमोल किर्तीकर यांनी केला होता. त्यातच मतमोजणी केंद्रावर खासदार रवींद्र वायकर यांच्या निकटवर्तीयांकडं मोबाईल सापडल्यामुळं किर्तीकरांच्या आरोपाला खतपाणी मिळालं होतं. ईव्हीएम यंत्रात कोणत्याही प्रकारचा फेरफार करता येत नसून, ईव्हीएम हॅक (EVM Hacking) होऊ शकत नसल्याचं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी (Vandana Suryavanshi) यांनी दिलं.

माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी (ETV Bharat Reporter)

ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपीची गरज नाही : मोबाईलच्या माध्यमातून मतमोजणी केंद्रावर फेरफार झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी म्हणाल्या की, "ईव्हीएम ही एक स्वतंत्र प्रणाली आहे. ईव्हीएम ओटीपीवर ओपन होत नाही. ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणत्याही ओटीपीची गरज नसते. तसेच ईव्हीएम मशीन कोणत्याही उपकरणाशी जोडले देखील नाही. त्यामुळं यासंदर्भात एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे. याप्रकरणी संबंधित वृत्तपत्रावर आयपीसी 499 अंतर्गत मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नोटीस देखील पाठवण्यात आली आहे."

सीसीटीव्ही फुटेजसाठी कोर्टाचा निर्णय : "काही लोकांना आम्ही डेटा अपलोड करण्यासाठी मोबाईल वापरण्यास परवानगी दिली होती. त्यात ऑपरेटर दिनेश गुरव यांचा समावेश होता. मात्र, तो मोबाईल त्या व्यक्तीपर्यंत कसा पोहचला याबाबत आम्ही गुन्हा दाखल केला असून, पोलीस यंत्रणा सखोल चौकशी करत आहे. माझ्यासाठी मतमोजणी महत्त्वाची होती. सीसीटीव्ही फुटेज देण्यासंदर्भात कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत सीसीटीव्ही फुटेज अमोल किर्तीकर आणि पोलिसांना देता येणार नाही," असंही वंदना सूर्यवंशी यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. काय सांगता! ईव्हीएम हॅक करण्यासाठी थेट विरोधी पक्ष नेत्याकडं केली अडीच कोटींची मागणी, नेमका मॅटर काय? - Ambadas Danve
  2. मुंबई उत्तर पश्चिम निवडणुकीत ईव्हीएमचे हॅकिंग? काँग्रेसनं निवडणूक आयोगाला विचारले 'हे' दोन प्रश्न - Mumbai North West election
  3. ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड? लंकेनी गैरसमजातून आरोप केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण - Nilesh Lanke On EVM Machines

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.