ETV Bharat / politics

'तीन दिवसात माफी मागा'; नितीन गडकरींची मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस, काय आहे प्रकरण?

Nitin Gadkari legal notice to Congress : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा व्हिडिओ शेअर करणं काँग्रेसला महागात पडू शकतं. या प्रकरणी नितीन गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस पाठवलीय. तसंच त्यांनी तीन दिवसात लेखी माफी मागावी असंही म्हटलंय.

Nitin Gadkari legal notice to Congress
Nitin Gadkari legal notice to Congress
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 9:14 AM IST

Updated : Mar 2, 2024, 10:13 AM IST

नागपूर Nitin Gadkari Legal Notice to Congress : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस पाठवलीय. त्यांच्याबद्दल एक व्हिडिओ काँग्रेसच्या अधिकृत X (पुर्वीचं ट्विटर) हँडलवरुन शेअर करण्यात आला. इतकंच नाही तर काँग्रेसच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये त्यांना लेखी माफी मागण्यासही सांगण्यात आलंय.

Nitin Gadkari Legal Notice to Congress
Nitin Gadkari Legal Notice to Congress

जाणीवपूर्वक पोस्ट केल्याचा आरोप : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटलंय की, 'काँग्रेस पक्षानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेला व्हिडिओ खरा नाही, तसंच त्यात छेडछाड करण्यात आलीय. नितीन गडकरी हे विरोधी राजकीय पक्षाचे सदस्य असल्यानं काँग्रेसनं विचारपूर्वक तसंच जाणीवपूर्वक ही पोस्ट केलीय. पूर्णपणे माहिती घेतल्यानंतरच कोणताही माझ्या संदर्भात कोणताही व्हिडिओ किंवा विधान तुमच्या सोशल मीडिया साइटवर शेअर केलं जावं. म्हणून कायदेशीर नोटीस पाठवत आहे,' असं म्हटलंय.

Nitin Gadkari Legal Notice to Congress
Nitin Gadkari Legal Notice to Congress
Nitin Gadkari Legal Notice to Congress
Nitin Gadkari Legal Notice to Congress

तीन दिवसात लेखी माफी मागावी : कॉंग्रेसकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओचं कॅप्शन जाणूनबुजून लपवण्यात आलंय. हे केवळ केंद्रीय मंत्र्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. व्हिडिओबाबत दिलेलं शीर्षकही पूर्णपणे चुकीचं असून वस्तुस्थितीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं नितीन गडकरी यांच्या वकिलांनी नोटीसमध्ये म्हटलंय. तसंच ते विधान किंवा तो व्हिडिओ सोशल मीडियावरुन काढून टाकण्यासही या नोटीसमध्ये सांगण्यात आलंय. यासोबतच त्यांनी तीन दिवसात लेखी माफी मागावी, असंही सांगण्यात आलंय. 'काँग्रेसनं तसं न केल्यास दिवाणी आणि फौजदारी असे दोन्ही पर्याय खुले आहेत,' असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आलाय.

काँग्रेसनं शेअर केला व्हिडिओ : काँग्रेसनं त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शुक्रवार म्हणजेच 1 मार्च 2024 रोजी एक व्हिडिओ शेअर केला होता. सुमारे 19 सेकंदांच्या व्हिडिओत 'केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शेतकरी आणि मजूर नाराज असल्याचं वर्णन करत असून, ते थेट केंद्र सरकारवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत,' असं दृश्य आहे.

खरा व्हिडीओ गडकरींनी केला पोस्ट : "जेव्हा गांधीजी होते, त्यावेळी 90 टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहायची. त्यानंतर हळूहळू 30 टक्के लोक मायग्रेट होऊन शहरात आले. गावात चांगले रोड नव्हते, पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, चांगले रुग्णालय नाही, शाळा सुद्धा चांगला नव्हत्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात काम झालं आहे !" असा तो व्हिडीओ आहे. या व्हिडीओमधून हवं ते कट करुन जनतेची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचा दावा नितीन गडकरी यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आलाय.

हेही वाचा :

  1. नेपोटिझम वादावर चर्चा करणाऱ्या कंगनाला सहा वर्षानंतर गडकरींकडून मिळालं 'समाधानकारक' उत्तर
  2. नागपूर मतदारसंघात कोण मारणार बाजी? 'ही' आहेत राजकीय समीकरणे

Last Updated : Mar 2, 2024, 10:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.