ETV Bharat / politics

"शकुनी मामामुळंच 'वंचित'...."; नितेश राणेंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप - Nitesh Rane On Sanjay Raut - NITESH RANE ON SANJAY RAUT

Nitesh Rane On Sanjay Raut : वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांची युती संपुष्टात आलीय. यावरून भाजपा नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) आरोप करत त्यांना युती तोडण्यासाठी जबाबदार ठरवलंय. तसंच पुढचा शिमगा हा धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात होणार असून, तेव्हा संजय राऊत आर्थर रोड जेलमध्ये शिमगा महोत्सव साजरा करत असतील, असा खोचक टोलाही लगावलाय. ते मुंबईत बोलत होते.

Nitesh Rane On Sanjay Raut
नितेश राणे आणि संजय राऊत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 4:24 PM IST

Updated : Mar 24, 2024, 4:52 PM IST

प्रतिक्रिया देताना नितेश राणे

मुंबई Nitesh Rane On Sanjay Raut : "शिमगा हा धार्मिक आणि सांस्कृतिक सण आहे. पण महाराष्ट्रात ज्याप्रमाणं आरोप-प्रत्यारोप होत आहेत, खालच्या स्तराची टीका होत आहे, त्या कारणानं शिमग्याला गालबोटं लावण्याचं काम सुरू आहे," अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. या टीकेला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

पुढच्या वर्षी जेलमध्ये शिमगा महोत्सव होणार : संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले की, "रोज सकाळी उठून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याची सुरुवात कोणी केली? वैयक्तिक आरोप- प्रत्यारोप कोणी सुरू केले? भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर आणि नेत्यांवर वैयक्तिक आरोप कोणी सुरू केले? म्हणून मी संजय राऊत यांना सांगेन की, शिमगा महोत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण हे निश्चितपणे टिकेल. ते टिकवण्याचं काम ही महाराष्ट्रातील जनता करेल. पुढच्या वर्षीचा शिमगा हा धार्मिक आणि सांस्कृतिक होईल. कारण पुढच्या वर्षी शिमग्याच्या वेळी संजय राऊत हे आर्थर रोड जेलमध्ये बसून शिमगा महोत्सव साजरा करतील. म्हणून पुढच्या वर्षीचा शिमगा कुठलंही राजकीय, सामाजिक वातावरण खराब न करता धार्मिक आणि सांस्कृतिक पद्धतीनेच होईल."

शाहू महाराज छत्रपती काँग्रेसच्या तिकीटावर का लढत आहेत? : भाजपानं छत्रपतींच्या गादीचा सन्मान राखला नाही. असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यावरही भाष्य करताना नितेश राणे म्हणाले की, "छत्रपतींच्या गादीचा सन्मान हा भाजपानं ठेवला नाही ही बोलण्याची हिंमत संजय राऊत करत आहेत. मी गजनी झालेल्या संजय राऊत यांना आठवण करून देईन की, जाहीर कार्यक्रमांमध्ये छत्रपतींच्या वंशजांचे पुरावे कोणी मागितले होते? आमच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा बोलून आमच्या माता-भगिनींचा अपमान कोणी केला होता? छत्रपतींच्या गादीचा सन्मान जितका पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपा पक्षानं ठेवला आहे, तितका कोणीच ठेवला नाही."

शाहू महाराजांनी 'या' तिकिटावर लढण्याचा निर्णय का घेतला? : संभाजीराजे छत्रपती यापूर्वी राज्यसभेचे खासदार हे भाजपाच्या पाठिंब्याने झाले होते. आजही उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे आमचे खासदार आहेत. परंतु, एका प्रश्नाचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावं की, शाहू महाराजांनी कोल्हापूरची जागा काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्याचा निर्णय का घेतला? ही जागा ठाकरेंकडं होती. मग शाहू महाराजांनी ठाकरे गटाऐवजी काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याचा निर्णय का घेतला? या प्रश्नाचं उत्तर संजय राजाराम राऊत आणि त्यांच्या मालकानं द्यावं," असा खोचक सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केलाय.

वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं नव्हतं : प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती तुटली. त्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, "अपेक्षेप्रमाणं शकुनी मामानं आपली चाल खेळली आणि यशस्वी केली. मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो की, वंचित बहुजन आघाडीबरोबर शिवसेनेची युती हा शकुनी मामा होऊ देणार नाही. जेव्हा जेव्हा वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करण्याची वेळ आली तेव्हा ती चर्चा कशी विस्कटली जाईल. त्यामध्ये अडथळे कसे येतील. यावर संजय राऊत यांनी बारीक लक्ष ठेवलं होतं."

घाणेरडं राजकारण सुरू : "शनिवारी प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं की, ठाकरे गटाबरोबर त्यांची युती संपलेली आहे. कुणालाही मातोश्रीच्या जवळ येऊ द्यायचं नाही. असं घाणेरडं राजकारण संजय राऊत करत आहेत. त्यांनी वंचित बहुजन आघाडीला अशा जागा दिल्या की ते कधीच जिंकू शकत नाहीत. प्रकाश आंबेडकरांनी मागितलेल्या जागा कुठल्याही अटी- शर्तीविना त्यांना दिल्या असत्या तर लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला असता. खऱ्या अर्थानं यांना भीमशक्तीला एकत्र घ्यायचं आहे. परंतु शकुनी मामानी आपली चाल खेळली आणि वंचित बहुजन आघाडीबरोबर सुरू असलेले चर्चेचे सर्व दरवाजे बंद केलेत," असा आरोप नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.

हेही वाचा -

  1. नागपुरात नितीन गडकरींविरोधात ठाकरे काँग्रेसचा 'विकास' करणार का? - Nagpur Lok Sabha Constituency
  2. "त्यांच्याकडे पैलवान आहेत तर आमच्याकडे वस्ताद"; आमदार रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांना डिवचलं - Ravindra Dhangekar
  3. पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसचे अजय राय तिसऱ्यांदा लढविणार निवडणूक, वाराणसी मतदारसंघात काय आहेत समीकरणे? - varanashi lok sabha elections

Last Updated : Mar 24, 2024, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.