मुंबई MVA meeting over seat sharing : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सगळ्याच पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यास सुरुवात केलीय. शिवसेना ठाकरे गटाकडून बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीवरुन काँग्रेस पक्ष नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. उमेदवारांच्या घोषणेनंतर काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून ठाकरे गटाच्या विरोधात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यामुळं ठाकरे गटाच्या यादीनंतर महाविकास आघाडीत 'ऑल इज नॉट वेल' असल्याचं पाहायला मिळतंय.
आघाडी धर्म पाळायला हवा : शिवसेना ठाकरे गटानं बुधवारी 17 उमेदवारांची नावं जाहीर केली. जेव्हा काही जागांवर चर्चा सुरू आहे आणि आपण आघाडीत आहोत, तेव्हा आघाडी धर्म पाळणे ही सर्वांची जबाबदारी आहे.असं म्हणत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ठाकरे शिवसेनेच्या यादीवर नाराजी वक्त केलीय. सांगली आणि मुंबईतील काही जागांवर चर्चा सुरू होती, तेथील उमेदवार जाहीर करण्यात आले. काँग्रेसकडून त्या जागांचा आग्रह धरलाय. चर्चा सुरू असताना उमेदवार जाहीर करणं योग्य नसल्याचंही थोरात म्हणाले. सगळ्यांनी आघाडी धर्माचं पालन करायला हवं अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेनं या जागांवर फेरविचार करावा, असं आवाहनही बाळासाहेब थोरात यांनी केलंय.
आघाडी धर्माला गालबोट : ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील नाराजी व्यक्त केलीय. चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित करणं हे आघाडी धर्माला गालबोट लावल्यासारखं आहे. यावर त्यांनी पुनर्विचार करावा असं आवाहनही त्यांनी ठाकरे शिवसेनेला केलंय. महाविकास आघाडीत जागा वाटपात चर्चा सुरू आहे. बैठकीतील निर्णय अंतिम होणं बाकी असताना आघाडीचा धर्म पाळतात आनंद झाला असता, असंही वडेट्टीवार म्हणाले.
संजय निरुपमांचा संताप : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे संजय निरुपम लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र याठिकाणी अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपम संतापलेत. ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या मुंबईतील उमेदवारांच्या नावावरुन संजय निरुपम यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
हेही वाचा :