पुणे MLA Atul Benke : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार असून, या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांना सोडून गेलेले आमदार पुन्हा परत येणार असल्याची चर्चा सुरू आहे. आज पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे जुन्नर येथील अल्पसंख्याक समाजातील काही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेत, आमदार अतुल बेनके यांना पुन्हा एकदा पक्षात परत घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली.
अतुल बेनकेंना शरद पवार गटात घ्या : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे ते असताना जुन्नर येथील मुस्लिम समाजातील काही नेते तसंच धर्मगुरू यांनी त्यांची भेट घेतली. सध्या अजित पवार यांच्या पक्षात असलेले आमदार अतुल बेनके यांना आपल्या पक्षात घ्यावं, ही विनंती त्यांनी शरद पवार यांच्याकडं केली. यावेळी जुन्नर येथील माजी नगराध्यक्ष फिरोज पठाण, वाजीद इनामदार, गुलाम अस्करींसह मुस्लिम समाजाचे धर्मगुरू उपस्थित होते.
अतुल बेनकेंना उमेदवारी मिळणार का? : यावेळी माजी नगराध्यक्ष फिरोज पठाण म्हणाले, "आम्ही शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत आम्ही त्यांना सांगितलं की, जुन्नर विधानसभेसाठी आमदार अतुल बेनके यांना पक्षात पुन्हा एकदा परत घ्यावं आणि त्यांना उमेदवारी द्यावी. आपल्या पक्षाचे खासदार आम्ही निवडून आणले. आता आपल्याच पक्षातील आमदार निवडून यावेत. आमदार अतुल बेनके यांना उमेदवारी आपल्या पक्षातून द्यावी, अशी आम्ही विनंती केली. शरद पवार यांनी देखील आम्हाला सांगितलं की, याबाबत मी नक्कीच विचार करेन."
हेही वाचा -
- 'फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली...', वंचित बहुजन आघाडीचा दावा - Thackeray Vs Fadnavis
- केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; सुप्रिया सुळे म्हणतात.... - Supriya Sule On Amit Shah
- पंतप्रधान आणि गृहमंत्री राज्यात आले की उद्योग बाहेर जातात; संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut On Amit Shah