ETV Bharat / politics

...‘त्यांना’ राज्यात दंगली घडवायच्यात; मनोज जरांगेंचा फडणवीस आणि भुजबळांवर आरोप - Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मात्र मराठ्यांनी शांततेची भूमिका घ्यावी, त्यांची ही योजना हाणून पाडा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. ते नाशिकमध्ये मराठा जनजागृती शांतता रॅलीचा समारोप आणि सभा कार्यक्रमात बोलत होते.

Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 14, 2024, 3:17 PM IST

नाशिक Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जरांगे पाटील यांनी राज्यात काढलेल्या शांतता रॅलीचा समारोप मंगळवारी (दि. 13) नाशिकमध्ये झाला. जरांगे पाटील यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी जरांगे पाटील यांची भूमिका ऐकण्यासाठी जिल्हाभरातून हजारो मराठा बांधव सभेत उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावरून जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाना साधला.

सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील (Etv Bharat Reporter)

भुजबळ म्हणजे नाशिक जिल्ह्याला लागलेली साडेसाती आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी भुजबळ यांनी संपवली आता फडणवीसचा नंबर आहे. देवेंद्र फडणवीस यांचा देखील ते पक्ष संपवतील. गळेल वासरू सारखं फडणवीस याचं झालं आहे आणि जो मराठ्यांना त्रास देईल त्याचा कार्यक्रम झालाच समजा. - मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक

निवडणूक लढवण्याचे संकेत : "मराठा हा ओबीसी आरक्षणात आहे. काहीही झालं तरी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं. विधानसभा निवडणुकीसारखी संधी परत येणार नाही. जातीला बाप माना, निवडून आल्यावर भावनिक होऊ नका, आपले कुणीच नाही नंतर ओरडत बसू नका, वेळ आल्यावर बदला घ्यायला शिका. 42 ते 45 वर्षे फसवलं आता सगळ्यांचे टांगे पलटी कारायचे आहेत. सरकार आरक्षण देते का, याबाबत 29 तारखे पर्यंत वाट बघू. त्यानंतर बघू काय करायचं" असं म्हणत जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचे संकेत दिले.

मी नारायण राणेंचा सन्मान करतो : मराठा बांधवांना आवाहन करताना जरांगे म्हणाले की, नारायण राणेंचा मी सन्मान करतो. राणे यांचं समाजा प्रति असलेलं योगदान आणि त्यांच्या वयाचा विचार करता, त्यांच्यावर टीका करू नका. परंतु राणे यांनी काहीही बोलले तर ऐकून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा -

  1. "छगन भुजबळ 'अपशकुनी', पक्षाचं वाटोळं केलं"; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल - Manoj Jarange Patil
  2. नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटलांची रॅली; 'भुजबळ फार्म'ची सुरक्षा वाढवली, शाळांना सुट्टी जाहीर - Manoj Jarange Patil Rally Nashik
  3. शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलन हे देवेंद्र फडणवीसांचं कारस्थान; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप - Manoj Jarange Patil

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.