पुणे Manoj Jarane Patil : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पुण्यात मोठी घोषणा केलीय. सगेसोयरेची अंमलबजावणी, मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा करण्यात यावा. जर हा कायदा केला नाही तर सर्व जातींना सोबत घेऊन विधानसभेला 288 जागा लढवणार असल्याची घोषणा यावेळी जरांगेंनी केली. तसंच येत्या 4 तारखेपासून सगेसोयरेची अंमलबजावणी तसंच मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा करण्यात यावा यासाठी आमरण उपोषण देखील करण्यात येणार असल्याचं यावेळी जरांगेंनी सांगितलं.
नायालयासमोर सर्व समान : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आज पुणे न्यायालयात हजर झाले. न्यायालयानं त्यांना 2013 साली कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावलं होतं. त्यानंतर ते न्यायालयात हजर झाले आहेत. दरम्यान यासंदर्भात जरांगे पाटील म्हणाले की, "न्यायालयाच्या समोर सर्व समान आहेत. न्यायालयाचा सन्मान केला पाहिजे."
दोन्ही समाजाला शांततेचं आवाहन : तसंच बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी जातीय तेढ निर्माण झालीय, त्याबाबत जरांगेंना विचारल असता ते म्हणाले की, "मी याआधी देखील आवाहन केलं होतं आणि आता देखील दोन्ही समाजाला आवाहन करत आहे की शांत राहा कारण आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. समाज आधी देखील शांत होता आणि आता देखील शांत आहे." पण त्यांच्या बाजूनं देखील आवाहन करणं गरजेचं आहे. पण ते करत नाहीत. मी आतापर्यंत जतिविषयक काहीही बोललो नाही. मी कुठल्याही ओबीसी बांधवाला दुखावलेलं नाही. नेते हा विरोध करत असून त्यांना मी विरोध करत असल्याचं यावेळी पाटील म्हणाले.
हेही वाचा :
- माझं कुटुंब उद्याला जिवंत नसलं तरी मी बाजूला हटणार नाही- मनोज जरांगे पाटील - Manoj Jarange Patil
- "मराठा आरक्षणात सगेसोयऱ्यांना विरोध करणाऱ्यांना असं पाडा की...", मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन - Manoj Jarange Patil Appeal
- मराठ्यांना न्याय मिळाला नाही तर पुन्हा मैदानात उतरणार...; मनोज जरांगेंनी उपसलं उपोषणाचं हत्यार - Maratha Reservation