ETV Bharat / politics

"पुणे लोकसभेसाठी पक्षाकडून माझाच क्लेम", मनसे नेते वसंत मोरे यांचा दावा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 4:18 PM IST

Loksabha Election 2024 MNS Candidates : लोकसभा निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार आहेत. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील आपलं नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगानं मनसेकडून काही मोजक्या जागांवर जोरदार तयारी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातून मनसे नेते वसंत मोरे यांनी 'पुणे लोकसभेसाठी पक्षाकडून माझाच क्लेम होणार' असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, वसंत मोरे सोडून अजून 4 जणं पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत.

pune lok sabha vasant more
पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे इच्छुक

पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे इच्छुक

पुणे Loksabha Election 2024 MNS Candidates : पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर सोपवली होती. अमित ठाकरे हे पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून काम बघत आहेत. असं असतानाच आता पुण्यातून मनसेतर्फे लोकसभा निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांची नावं राज ठाकरे यांना कळविण्यात आली आहेत. यामध्ये वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू वागसकर, किशोर शिंदे, गणेश सातपुते यांच्या नावांचा समावेश आहे. यावरच आता मनसे नेते वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली असून पुणे लोकसभेसाठी पक्ष त्यांचीच निवड करणार असा दावाही त्यांनी केला आहे.

काय म्हणाले वसंत मोरे : प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना वसंत मोरे म्हणाले की, "सर्वांचे एकमत होऊन माझ्या नावावर सहमती व्हायला हवी. स्वतः वहिनी (शर्मिला ठाकरे) सुद्धा वसंत तुला लोकसभेत पाहायचं आहे असं म्हणाल्या आहेत. मी पहिल्या दिवसापासून लोकसभेवर दावा करत असल्यानं लोकसभेची 100% उमेदवारी मनसे कडून मलाच मिळणार", असा दावा मोरे यांनी केला. तसंच मनसेकडं पुणेकर खूप आशेनं पाहत आहेत. "माझं जर काम बघितलं तर तर सर्व उमेदवारांपेक्षा मी सातत्यानं चांगलं काम करतोय. त्यामुळं मलाच उमेदवारी मिळणार."

मी सातत्यानं प्रयत्न करतोय : "माझी इच्छा मी राज ठाकरे आणि अमित ठाकरेंपर्यंत पोहोचवली आहे. राज ठाकरे मला नक्कीच संधी देतील आणि मी दिल्लीत जाईन. गेल्या पंचवीस वर्षांपासून मी पुण्यात काम करत असून पुण्यातील पाण्याचे प्रश्न, वाहतुकीचे प्रश्न, लोकांच्या समस्या सोडवण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करतोय. त्या प्रश्नांची मला जाण आहे." तसंच मी जरी बारामती लोकसभेत काम करत असलो तरी मी तिथे कधीही दावा केलेला नाही. मी पहिल्या दिवसापासून पुणे लोकसभेवर ठाम असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. पुण्यात लोकसभा उमेदवारीसाठी मनसेतून वसंत मोरे, साईनाथ बाबरची बॅनरबाजी, अमित ठाकरेंच्या नेतृत्वाचा लागणार कस
  2. MNS : मनसे नेते वसंत मोरे यांनी सिद्धार्थ बहुउद्देशीय सोसायटीचं कार्यालय फोडलं
  3. MNS Lok Sabha Preparation: इंजिन लोकसभा निवडणुकीच्या मैदानात.. अमित ठाकरेंसह मनसे नेत्यांच्या 'या' मतदारसंघात नियुक्त्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.