ETV Bharat / politics

"माझ्या विरोधात नवं कारस्थान रचण्यात आलं...", अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप - Anil Deshmukh - ANIL DESHMUKH

CBI registers FIR Anil Deshmukh : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. यावरून अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उलट आरोप केलाय.

CBI registers FIR Anil Deshmukh
अनिल देशमुख (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2024, 10:26 PM IST

नागपूर CBI registers FIR Anil Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अनिल देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला.

अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

नवं कारस्थान रचण्यात आलं : नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, "गेल्या तीन वर्षापासून काय चालू आहे हे ते जनता पाहात आहे. तीन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनं देवेंद्र फडणीस यांनी परमवीर सिंग आणि सचिन वाजे यांना सोबत घेऊन माझ्यावर आरोप केले होते. त्यांनी आरोप केल्यानंतर माझी चौकशीही करण्यात आली. चौकशीनंतर हे प्रकरण हायकोर्टात गेलं. त्यावेळी हायकोर्टानं माझ्या विरोधात पुरावे नसल्याचा निकाल दिला. ऐकीव माहितीच्या आधारे माझ्यावर आरोप झाले, असं हायकोर्टानं स्पष्ट केलं. ते प्रकरण निकाली निघत असतानाच आता मी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला, असं नवं कारस्थान रचण्यात आलं," असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.

देवेंद्र फडणीसांचं कारस्थान : "भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला अटक करण्यासाठी मी पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आलाय. हे सर्व देवेंद्र फडणीस यांचं कारस्थान आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी माझ्यावर अशाच प्रकारे खोटे आरोप केले. आता पुन्हा त्यांनी माझ्यावर सीबीआयच्या मदतीनं गुन्हा दाखल केला. मी चौकशीला सामोरा जाईन," अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.

हेही वाचा

  1. "अनिल देशमुखांना नोटीस पाठवण्यात फडणवीसांचा हात", रोहित पवारांचा गंभीर आरोप, देशमुखांचाही उपरोधिक टोला... - Rohit Pawar On Devendra Fadnavis
  2. "महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही...", हसन मुश्रीफांना समरजित घाटगेंचं प्रत्युत्तर - Samarjeet Ghatge On Hasan Mushrif
  3. रावसाहेब दानवेंच्या 'त्या' वक्तव्यामुळं उद्धव ठाकरेंची 'बार्गेनिंग पॉवर' वाढणार? काय आहेत कारणं? वाचा स्पेशल रिपोर्ट - Vidhan Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.