मुंबई Loksabha Election 2024 : काही दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये अजून जागावाटपाचं गुऱ्हाळ कायम आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (शनिवारी) एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. त्यांच्या पक्षाकडून त्यांनी उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून पहिल्या उमेदवाराची घोषणा केलीय. अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी केलीय. दुसरीकडं मविआच्या जागावाटपा आधीच उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात असून, काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
बाप विरुद्ध बेटा अशी लढत? : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. या सहापैकी 3 भाजपाचे आमदार आहेत, तर 3 ठिकाणी ठाकरे गटाचे (शिवसेना) आमदार आहेत. सध्या उत्तर पश्चिम-मुंबई लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार शिंदे गटाचे गजानन किर्तीकर हे आहेत. अजून महायुतीतील जागावाटप याबाबत अंतिम घोषणा झाली नाही. मात्र या ठिकाणी जर शिंदे गटाकडून गजानन किर्तीकर यांना उमेदवारी मिळाली तर या मतदारसंघात बाप विरुद्ध बेटा अशी लढत पाहयला मिळणार आहे.
आघाडीत बिघाडी? : एकिकडं लोकसभा निवडणूक जागावाटप आणि उमेदवारीवरुन महाविकास आघाडीमध्ये बैठकांचं सत्र सुरु आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितमुळं जागावाटपाचा पेच आणखी वाढला असताना, आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाकडून पहिला उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या रुपानं जाहीर केला आहे. त्यामुळं ही जागा काँग्रेसला मिळेल अशी आशा होती. त्याआधीच उद्धव ठाकरेंनी पहिला उमेदवार जाहीर करत नवीन राजकीय खेळी खेळली आहे. एकीकडं महाविकास आघाडीत जागांचा अजून तिढा सुटला नसताना, दुसरीकडं उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.
बाप विरुद्ध बेटा अशी लढत? : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. या सहापैकी 3 भाजपाचे आमदार आहेत, तर 3 ठिकाणी ठाकरे गटाचे (शिवसेना) आमदार आहेत. सध्या उत्तर पश्चिम-मुंबई लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार शिंदे गटाचे गजानन किर्तीकर हे आहेत. अजून महायुतीतील जागावाटप याबाबत अंतिम घोषणा झाली नाही. मात्र या ठिकाणी जर शिंदे गटाकडून गजानन किर्तीकर यांना उमेदवारी मिळाली तर या मतदारसंघात बाप विरुद्ध बेटा अशी लढत पाहयला मिळणार आहे.
मी विजयी सभेलाच येणार : उद्धव ठाकरेंनी शनिवारी मुंबईतील काही विभागात प्रत्यक्ष भेट देऊन पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाद साधला. "उत्तर पश्चिम-मुंबई लोकसभा मतदार संघातून अमोल किर्तीकर हा उमेदवार मी तुम्हाला दिलेला आहे. ते जिद्दीने, एकनिष्ठेनं लढत आहेत, त्यांना निवडूण आणा. निवडणुकीत मी प्रचाराला येणार नाही, पण विजयी सभेला नक्की येणार. सगळेच दिवस सारखे नसतात, उद्या आमचे दिवस येतील तेव्हा हिशोब बरोबर करण्यात येईल," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपाला इशाला दिलाय.
संजय निरुपम यांची नाराजी : उद्धव ठाकरेंनी उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केलीय. उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर काल रात्रीपासून मला फोन येत आहेत. असं कसं होऊ शकतं? मविआच्या दोन डझन बैठका होऊनही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. या जागेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, असं मला काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी सांगितलं आहे. परंतु असं असताना शिवसेनेचा उमेदवार जाहीर करणं हे युती धर्माचं उल्लंघन नाही का?, की काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी असं कृत्य जाणीवपूर्वक केलं जात आहे? असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केलाय. यात काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने हस्तक्षेप करावा, असं आवाहन काँग्रेसला सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत संजय निरुपम यांनी केलंय.
हेही वाचा -
- 'भाजपावाल्यांना लग्नात बोलावू नका, येतील, जेवतील अन् नवरा बायकोचं भांडण लावतील'; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उमेदवार जाहीर करणं हे युती धर्माचे उल्लंघन नाही का? संजय निरुपम यांची उद्धव ठाकरेंवर टीका
- देवेंद्र फडणवीसांच्या टीकेनंतर संजय राऊतांचा पलटवार ; म्हणाले "आम्ही चाकू सुरीवाले, आमची कट्यार . . "