ETV Bharat / politics

"उद्धव ठाकरेंना वेड लागलंय"; ‘त्या’ दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर - Devendra Fadnavis Reply - DEVENDRA FADNAVIS REPLY

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) मुख्यमंत्री करून मी दिल्लीत जाईन, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 9:43 PM IST

Updated : Apr 20, 2024, 10:07 PM IST

सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस

अमरावती Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : महाराष्ट्रात आदित्य ठाकरे यांना (Aaditya Thackeray) मुख्यमंत्री करून देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार होते, असा शब्द खुद्द देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला दिला होता, असं बोलणारे उद्धव ठाकरे हे पूर्वी अमित शाह यांनी मला मुख्यमंत्री करणार असं आश्वासन दिलं होतं, असं म्हणत होते. खरंतर उद्धव ठाकरे यांचं असं वक्तव्य म्हणजे ते भ्रमिष्ट झाल्याचं सूचक आहे, असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना दिलंय. फडणवीस हे दर्यापूर येथे अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत बोलत होते.

उद्धव ठाकरेंना वेड लागलंय : "कालपर्यंत उद्धव ठाकरे हे वेगळ्याच भ्रमात होते. कालपर्यंत म्हणत होते की, अमित शाहांनी त्यांना कुठल्यातरी खोलीत नेऊन मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. आता त्यांचा भ्रम बदलला. आता म्हणतात की, देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करतो असा शब्द दिला. उद्धव ठाकरेंनी ठरवावं की त्यांना नेमका कोणी शब्द दिला होता," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षातील नेत्यांना केवळ आपल्या मुलांची काळजी : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे घर, कुटुंब असं काहीही नाही. नरेंद्र मोदी यांना केवळ देशातील प्रत्येक व्यक्तीची काळजी आहे. या देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी नरेंद्र मोदी झटत आहेत. दुसरीकडं मात्र, आमच्या विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांना आपला मुलगा आदित्य ठाकरेंची काळजी आहे. शरद पवार यांना देखील आपल्या मुलीची काळजी आहे. तिकडं सोनिया गांधी यादेखील केवळ आपल्या मुलाचाच विचार करत आहेत," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लोकसभेत आता 33 टक्के महिला : "सभा मंचावर बोटावर मोजण्या इतक्याच महिला दिसत आहेत. मात्र, लोकसभेत आता 33 टक्के महिलांना प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलाय. महिला सशक्तीकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष भर आहे. आता शासनाच्या प्रत्येक प्रकल्पांमध्ये बचत गटाच्या महिलांसाठी जागा राखीव ठेवली जाणार आहे. या देशातील महिला सशक्त व्हावी यासाठीच अमरावती लोकसभा मतदारसंघातील महिलांनी देखील नवनीत राणा यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी साथ द्यावी," असं आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

अमरावती शहर होणार आधुनिक : "येत्या काळात अमरावती शहराला आधुनिक बनवण्याची आमची योजना आहे. अमरावती शहरात एक टेक्स्टाईल पार्कमुळं अनेकांना रोजगार मिळाला आहे. येत्या काळात आणखी एक नवा टेक्स्टाईल पार्क अमरावतीच्या एमआयडीसीमध्ये उभा राहणार आहे. या टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील लाखो बेरोजगारांना रोजगार मिळेल," असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; मुख्यमंत्री आले सहकाऱ्याच्या मदतीला, म्हणाले... - CM Eknath Shinde
  2. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचं देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आश्वासन; उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ - Thackeray On Devendra
  3. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना 'सामना'; संदीपान भुमरेंना उमेदवारी - Lok Sabha Election 2024

Last Updated : Apr 20, 2024, 10:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.