ETV Bharat / politics

'ठाकरेंचा विजय ही तात्पुरती आलेली सूज, त्यांना हिंदुत्वाची लाज वाटते'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात - Eknath Shinde Speech

Eknath Shinde Speech : शिवसेना पक्षाचा आज 58 वा वर्धापन दिन आहे. मात्र शिवसेनेत आता दोन गट निर्माण झाले आहेत. यात दोन्ही गट आपला वेगळा मेळावा साजरा करत आहेत.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे (Social Media)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 9:42 PM IST

मुंबई Eknath Shinde Speech : शिवसेना पक्षाचा आज 58 वा वर्धापन दिन आहे. 58 वर्षे झालेल्या या शिवसेनेत आता दोन गट निर्माण झाले आहेत. पक्षात फूट पडल्यानंतरचा हा दुसरा मेळावा आहे. यात उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळा वर्धापन दिन साजरा करत आहे, तर दुसरीकडं एकनाथ शिंदेंची शिवसेनाही आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करत आहे. शिंदे गटाचा वर्धापन दिन वरळी डोम इथं होत आहे. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वावरुन उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलीय.

ही तात्पुरती सूज : या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, "शिवसेनेचा मूळ आधार आणि मतदार हा या अशा परिस्थितीतही शिफ्ट झाला नाही. हा मतदार धनुष्यबाणाकडे वळला. शिवसेनेचे 19 टक्के मूळ मतदार हे बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आहेत. ठाकरेंचे उमेदवार कसे निवडून आले हे प्रत्येकाला माहिती आहे. ही तात्पुरती आलेली सूज आहे." तसंच काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी आपण उठाव केला. मी सर्वांची भाषणं ऐकत होतो, दोन वर्षांपूर्वी आपण उठाव केला. तो खऱ्या अर्थानं आज निवडणुकीत जनतेनं शिक्कामोर्तब करुन दाखवला. मतदारांनी विश्वास दाखवला, त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही हा मी शब्द देत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

ठाकरेंना हिंदुत्वाची अ‍ॅलर्जी : बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवात तमाम हिंदू बांधवांनो अशी असायची. पण आज वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी हिंदू बांधवांनो म्हणणं टाळलं. कुठं गेलं तुमचं हिंदुत्व? मतांसाठी एवढी कसली लाचारी? धनुष्यबाण पेलायची ताकद फक्त शिवसेनेच्या मनगटात आहे. उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची अ‍ॅलर्जी आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची लाज वाटतेय. मतांसाठी ऐवढी कसली लाचारी. बाळासाहेबांच्या विचाराला त्यांनी तिलांजली दिली. त्यांचे विचार पायदळी तुडवले, असं म्हणत शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार प्रहार केला.

ठासून विजय मिळवला : लोकसभेच्या सात जागा आपण जिंकल्या. आपण तीन चार जागा आणखी जिंकलो असतो. आपण सहा जागा हरलो, त्यामध्ये का हरलो, त्यात जाऊ इच्छित नाही. आपल्याला महायुती मजबूत करायची आहे. मागचं सर्व विसरुन पुढं न्यायचं आहे. महायुतीमध्ये मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळं माझी जबाबदारी सर्वात जास्त आहे. तुमच्या साथीनं मी ती जबाबदारी पार पाडेन, असं सर्वांना वचन देतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेना ठाण्यात, कोकणात, संभाजीनगरमध्ये वाढली. हे सर्व शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. हे बालेकिल्ले अबाधित राखले. कोणी म्हणालं ठाणे पडेल, कल्याण पडेल, पण आपण हे किल्ले 2-2 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकले. संभाजीनगर जिंकलं, कोकणात एकही जागा ठाकरेंना मिळू शकली नाही. हा विजय घासून-पुसून नाही, ठासून विजय मिळवल्याचं शिंदे म्हणाले.

हेही वाचा :

  1. '...तर मी आतंकवादी आहे', वर्धापन सोहळ्यात उद्धव ठाकरे असं का म्हणाले? - Shivsena Foundation Day
  2. एकनाथ शिंदे यांचे बंड ते लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत शिवसेनेत काय वादळे आली? जाणून घ्या सविस्तर - Shiv Sena Foundation Day 2024
  3. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून वर्धापनदिनानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन; विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार? - Shiv Sena Foundation Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.