ETV Bharat / politics

घरी बसणाऱ्यांना कायमचे घरी बसवा; आम्ही विकासातील स्पीड ब्रेकर काढले, एकनाथ शिंदेंची टीका

महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या वरळीमधील निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झालं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2024, 10:15 PM IST

मुंबई : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज अनेक बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर कित्येक निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. दरम्यान, आता मंगळवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांनी आपल्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे.

वरळी कार्यालयाचं केलं उद्घाटन : आज वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (शिंदे पक्षाचे) उमेदवार मिलिंद देवरा यांच्या कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. यावेळी घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवा, आम्ही मुंबईतील विकासाचे स्पीड ब्रेकर काढले नाहीतर पुढील कित्येक वर्ष मुंबईत प्रकल्प दिसले नसते. आरे कारशेड, कोस्टल रोड, मेट्रो-3, महालक्ष्मी रेसकोर्समधील पार्क, अटल सेतू अशा प्रकल्पामध्ये महाविकास आघाडी सरकारनं स्पीड ब्रेकर टाकले होते. ते आम्ही काढून टाकले आणि विकासाला प्राधान्य दिलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणत महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

वरळीतील प्रश्न सोडवण्यात यश : पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारनं अनेक कामांना स्थगिती दिली होती. मात्र महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही अनेक लोक कल्याणकारी योजना आणल्या. अनेक विकासकामे केली. वरळीचा विचार करता वरळीतील पोलीस वसाहती, वरळी कोळीवाड्यामधील रखडलेले प्रकल्प, प्रेम नगर, सिद्धार्थ नगर, धोकादायक इमारतीचे प्रश्न सोडवले. त्याचबरोबर मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकासाच्या प्रकल्पांना आम्ही चालना दिली. वरळीतील रमाबाई नगरमधील 17000 भाडेकरूना आम्ही घर देणार आहोत. मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आपलं सरकार काम करेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. त्यामुळं आता वरळीचे दोनवेळा लोकसभेचे खासदार म्हणून राहिलेले मिलिंद देवरा प्रतिनिधित्व करतील. देवरा हे उत्तम काम करतील, त्यांना वरळीकरांनी बहुमताने निवडून द्यावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

तीच टेप रेकॉर्ड लावतात : कोणतीही निवडणूक आली की, काही लोक एकच टेपरेकॉर्ड लावतात ते म्हणजे महाराष्ट्रातून मुंबईला तोडणार. मात्र सतत हे एकच टेपरेकॉर्ड लावतात. केवळ निवडणुकीपुरती ही त्यांचं टेपरेकॉर्ड असतं असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करण्याचा आमचा मनसुबा आहे. मुंबईला फिनटेक कॅपिटल आणि पावर हाऊस बनवण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहिलं आहे. 'मतदानाच्या वेळी पाच मिनिटे तुमची तर पाच वर्षे आमची' हा आमचा शब्द आहे. काम करणाऱ्या लोकांना तुम्ही मते द्या आणि घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं.

हेही वाचा -

  1. नाशिक जिल्ह्यातील 15 जागांसाठी 200 उमेदवार रिंगणात, 137 उमेदवारांची माघार
  2. अर्ज मागे घेण्याची मुदत संपली; बीड विधानसभा मतदारसंघातून कोणी घेतली माघार? पाहा लिस्ट
  3. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट; महायुती महाविकास आघाडीत होणार समोरासमोर लढत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.