ETV Bharat / politics

सुधीर मुनगंटीवारांना मोठी जबाबदारी मिळणार? मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "योग्य व्यक्तीसाठी योग्य निर्णय..." - MAHARASHTRA CABINET EXPANSION

मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीमधील काही नेते नाराज असल्याचं बोललं जात आहे. यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

MAHARASHTRA CABINET EXPANSION
सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2024, 9:28 PM IST

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा रविवारी (15 डिसेंबर) मंत्रिमंडळ विस्तार झाला. नागपुरात नव्या मंत्र्यांच्या शपथग्रहन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तर काही जुन्या चेहऱ्यांना डावलण्यात आल्याचं पाहायला मिळालं. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना देखील डावलण्यात आल्यानं ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तसंच महायुती सरकारचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "सुधीर मुनगंटीवार पक्षाचे नेते असून ते अध्यक्ष देखील राहिले आहेत, त्यांनी संघटनेत देखील काम केलं आहे. त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते. पक्ष योग्य व्यक्तीसाठी योग्य निर्णय घेत असतो," असं बावनकुळे म्हणाले.

पुण्यात होत असलेल्या पुस्तक महोत्सवाला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी याबाबत वक्तव्य केलं. यावेळी ते म्हणाले, "पुणे शहरात पुस्तक महोत्सव होत आहे. या पुस्तक महोत्सवातून काहीतरी शिकण्यासाठी मी आलो आहे. देशात कुठेही एवढं मोठं आयोजन करण्यात आलं नाही. असं आयोजन पुस्तक महोत्सवात करण्यात आलं असून देशातील कानाकोपऱ्यातून लोक या पुस्तक महोत्सवाला भेट देण्यासाठी येत आहेत."

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Source - ETV Bharat Reporter)

पक्षाचा निर्णय मान्य करावं लागतो : काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अनेक नेते हे नाराज असल्याचं सांगितलं जातं आहे. याबाबत बावनकुळे यांना विचारलं असता ते म्हणाले, "मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत पक्ष निर्णय घेत असतो. भाजपामध्ये केंद्रीय पातळीवर निर्णय घेतले जातात. तसंच शिवसेना पक्षात निर्णय घेण्याचा अधिकार हा एकनाथ शिंदेंना तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निर्णय अजित पवार घेत असतात. कुठेही नाराजगीची गोष्ट नाही. पक्षामध्ये जो काही निर्णय होत असतो, तो मान्य करावा लागतो," असं बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा

  1. मी नाराज नाही, व्यथितही नाही: सुधीर मुनगंटीवार यांची स्पष्टोक्ती, मात्र देहबोली वेगळीच
  2. जयंत पाटील, रोहित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यासाठीच अजित पवारांनी छगन भुजबळांचा बळी घेतला का ?; लक्ष्मण हाकेंचा सवाल
  3. रिक्षावाला, पान टपरीवाला ते थेट मंत्री, 'या' मंत्र्यांचा संघर्षमय प्रवास, नक्कीच वाचा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.