ETV Bharat / politics

भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली 'ही' माहिती - BJP Core Committee Meeting

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 9:17 AM IST

BJP Core Committee Meeting : मुंबईत शुक्रवारी (21 जून) रात्री राज्यातील भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

BJP Core Committee Meeting in Mumbai
देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे (Source reporter)

मुंबई BJP Core Committee Meeting : भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी (21 जून) रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर पार पडली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका तसंच विधानसभेच्या जागा वाटपाबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, प्रवीण दरेकर आदी नेते उपस्थित होते.

विधान परिषदेच्या जागांवर चर्चा : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळं करण्याची विनंती केंद्रीय नेतृत्वाला केली. परंतु, केंद्रीय नेतृत्वानं विनंती नाकारल्यानंतर ही पहिलीच कोअर कमिटीची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पार पडली. येत्या 12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होत असून त्यामध्ये भाजपाच्या 5 जागांचा समावेश आहे. यासाठी उमेदवारांची निवड आणि निवडणूक रणनीती याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय.

महायुतीत कुठलाही वाद नको : ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं तयारी सुरू केलीय. या बैठकीसंदर्भात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये सर्वांनी एकत्रित निवडणुकीला सामोरं जायचंय. जागा वाटपाच्या मुद्द्यावर कुठल्याही नेत्याच्या वक्तव्यानं वाद होणार नाही, याची खबरदारी घेतली जावी, असंही या बैठकीत सांगण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ज्या विधानसभा मतदारसंघात जास्त मताधिक्य भेटलं होतं, त्यावरही चर्चा करण्यात आली. एकंदरीत लोकसभेतील पराभव आणि त्याची कारणं यावर बैठकीत मंथन करण्यात आलं", असं बावनकुळेंनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार राज्यातील नेतृत्व, भाजपानं विधानसभा निवडणुकीकरिता दिली 'ही' महत्त्वाची जबाबदारी - Devendra Fadnavis news
  2. देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी - बावनकुळे - Chandrasekhar Bawankule
  3. "महाविकास आघाडीला विधानसभेत..."; चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्धार, संघाच्या टीकेवर भाष्य करण्यास नकार - Chandrashekhar Bawankule

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.