ETV Bharat / politics

भाजपाच्या पहिल्या यादीत राज्यातील एकाच नेत्यावर 'कृपा', उत्तर प्रदेशातून दिलं लोकसभेचं तिकीट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 7:27 AM IST

Updated : Mar 3, 2024, 7:34 AM IST

Kripashankar Singh : भाजपानं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी शनिवारी संध्याकाळी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून केवळ एका नेत्याचा समावेश करण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या महाराष्ट्राचे माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांना भाजपानं उत्तर प्रदेशातील जौनपूर मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. 1999 नंतर या जागेवरुन भाजपाला विजय मिळवता आलेला नाही.

कृपाशंकर सिंह
कृपाशंकर सिंह

नवी दिल्ली Kripashankar Singh : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं जाहीर केलेल्या यादीत 18 राज्यांतील 195 उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भाजपानं या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेचा उमेदवार घोषित केलेला नाही. मात्र, महाराष्ट्रातील एक नावाचा या यादीत समावेश केला. महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांना भाजपानं उत्तर प्रदेशातील जौनपूर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिलीय. ते मुळचे उत्तर प्रदेशातील जौनपुरचे असून राजपूत समाजाचे आहेत. राजकीय गणितं बघूनच त्यांना भाजपानं उमेदवारी दिलीय. त्यांनी 2021 मध्ये भाजपात प्रवेश केला होता.

कोण आहेत कृपाशंकर सिंह : उत्तर प्रदेशातील जौनपूर मतदारसंघातून उमेदवारी मिळालेले कृपाशंकर सिंह हे कधीकाळी मुंबईतील सांताक्रूज भागातून आमदार होते. त्यांना 2004 मध्ये काँग्रेसचं सरकार असताना मंत्रीही करण्यात आलं होतं. त्यानंतर 2008 ते 2012 या काळात ते मुंबई कांग्रेसचे प्रमुख होते. 2009 च्या निवडणुकीत ते पुन्हा आमदार निवडून आले होते. त्यानंतर जम्मू काश्मीरबाबतच्या एनडीएच्या धोरणाला विरोध केल्यानंतर त्यांनी 2019 मध्ये काँग्रेसची साथ सोडली होती. त्यांनतर दोन वर्षांनी म्हणजेच 2021 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. बेहिशोबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र, त्यांना 2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपानं मोठी जबाबदारी दिली होती. भाजपानं त्यांना गुजरातमधील 10 जिल्ह्यांचं प्रभारी बनवलं होतं. तसंच भाजपानं महाराष्ट्रात प्रदेश उपाध्यक्ष पदीही त्यांची नियुक्ती केली होती.

भाजपाचा 25 वर्षांचा दुष्काळ संपणार? : भाजपाला 1999 पासून जौनपूरमध्ये निवडणूक जिंकता आलेली नाही. या मतदारसंघातून सध्या मायावतींच्या बहुजन सामज पार्टीचे श्याम सिंह यादव हे खासदार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या कृष्ण प्रताप सिंह यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात भाजपानं 1999 मध्ये शेवटची निवडणूक जिंकली होती. तेव्हा भाजपाचे स्वामी चिन्मयानंद विजयी झाले होते. त्यानंतर एका निवडणुकीत समाजवादी पक्षानं या जागेवरुन विजय मिळवला होता. त्यांनतर सलग तीन निवडणुकांमध्ये मायावतींच्या बसपानं या मतदारसंघातून विजय मिळवलाय.

हेही वाचा :

  1. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्राला स्थान नाही
  2. भाजपानं विश्वासघात केला, संजय राऊतांची देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांच्यावर टीका

Last Updated : Mar 3, 2024, 7:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.