ETV Bharat / politics

Rahul Gandhi Speech : "पंतप्रधानांनी 20-25 उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज...", राहुल गांधींचा गंभीर आरोप - Rahul Gandhi Nandurbar Rally Speech

Rahul Gandhi Speech : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) आता महाराष्ट्रात आली आहे. या यात्रेच्या निमित्तानं नंदूरबारमध्ये आज (12 मार्च) राहुल गांधींची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली.

Bharat Jodo Nyay Yatra in Nandurbar Congress Leader Rahul Gandhi Attacks On PM Narendra Modi over various issues
राहुल गांधी नंदुरबार सभा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 10:41 PM IST

नंदुरबार Rahul Gandhi Speech : महाराष्ट्रात आज (12 मार्च) भारत जोडो यात्रेचा शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यातून कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झाला. यावेळी राज्यभरातून काँग्रेसचे नेते नंदुरबार येथे दाखल झाले होते. हेलिकॉप्टरनं राहुल गांधी नंदुरबारमध्ये दाखल झाले. त्यानंतर वाहनातून त्यांनी शहरात रोड शो केला आणि सभास्थळी दाखल झाले. या सभेतील भाषणादरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर हल्लाबोल केला. तसंच पंतप्रधान मोदींनी 20-25 उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज माफ केल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी? : यावेळी बोलत असताना राहुल गांधी म्हणाले की, "आदिवासी हेच देशाचे खरे मालक आहेत, मात्र त्यांनाच त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं जातंय. या देशातील जल, जंगल आणि जमिनीवर पहिला अधिकार आदिवासींचाच आहे. पण भाजपा आदिवासींना वनवासी म्हणत हक्कापासून वंचित ठेवतंय. भाजपा सरकार आदिवासींचं जंगल, जमीन ताब्यात घेऊन अदानीला देत आहे. तसंच भाजपामुळंच या समाजाचं अस्तित्व धोक्यात आलंय. याच 20-25 उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज नरेंद्र मोदींनी माफ केलंय. मात्र, आदिवासी समाजाचं एक रुपया कर्ज त्यानी माफ केलं नाही", असा गंभीर आरोप त्यांनी केला.

22 लोकांकडं जितकी संपत्ती, तितकीच... : पुढं ते म्हणाले की, "यूपीए सरकारनं नंदूरबारमधून आधार कार्ड योजनेची सुरुवात केली होती. यातून आदिवासींची ओळख स्पष्ट करणारा संदेश दिला होता. आज देशातील 22 लोकांकडे जितकी संपत्ती आहे, तितकीच 70 कोटी लोकसंख्येकडं असून ही विषमता आहे."

आश्वासनांचा वर्षाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी राहुल गांधींनी आश्वासनांचा वर्षाव केला. ते म्हणाले की, "यूपीए सरकारनं आणलेला जमीन अधिग्रहण कायदा भाजपा सरकारने कमकुवत केलाय, आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर हा कायदा मजबूत केला जाईल. तसंच जातनिहाय जनगणना केली जाईल आणि शेतमालाला देखील एमएसपीचा कायदा लागू करण्यात येईल, तसंच जिथं आदिवासींची 50 टक्के लोकसंख्या आहे, तिथं सर्व निर्णय घेण्याचा अधिकार हा आदिवासींनाच दिला जाईल", असं ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. Rahul Gandhi News: राहुल गांधी, शरद पवारांसह संजय राऊत येणार एकाच व्यासपीठावर, 14 मार्चला चांदवडला सभा
  2. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्चला महाराष्ट्रात पोहोचणार
  3. काँग्रेसनं लोकसभेसाठी 39 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर; राहुल गांधी वायनाडमधूनच रिंगणात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.