ETV Bharat / politics

मंत्र्याच्या मतदारसंघात तब्बल नऊ हजार बोगस मतदार; निवडणूक आयोगात तक्रार दाखल - Bogus Voters Assembly Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Bogus Voters Assembly Election 2024 : विधानसभा निवडणूक ही 13 ऑक्टोबरनंतर कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तिकिटासाठी सर्वच इच्छूक फिल्डिंग लावत आहेत. अशातच आता नेतेमंडळी देखील कामाला लागले आहेत. रोज नवनवीन मुद्दे काढून सत्ताधारी-विरोधक आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच आता ठाकरे गटानं विद्यमान मंत्र्यावर गंभीर आरोप केलाय. वाचा सविस्तर बातमी...

Assembly Election 2024
निवडणूक आयोग (File Photo)

छत्रपती संभाजीनगर Bogus Voters Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली. पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड मतदारसंघात (Sattar Sillod Constituency) मतदारांची नावे दुबार, तिबार इतकंच नाही तर चौबार देखील नोंदवण्यात आल्याची तक्रार ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदार पाटील यांनी निवडणूक आयोगाकडं केली.

नऊ हजार बोगस मतदार : विधानसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असताना, मतदार यादीतील घोळ अद्याप कायम आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सिटी चौक पोलिसात बोगस मतदार (Fake Voter) असणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल केला होता. तरी अद्याप हजारो नावे कायम असून, ती नावे काढा, अशी मागणी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदार पाटील यांनी केली. त्यांनी काढलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड मतदारसंघात (Sillod Constituency) नऊ हजार बोगस मतदार आहेत. त्यांची माहिती निवडणूक आयोगाला दिली. कारवाई न झाल्यास न्यायालयात जाऊन निवडणूक स्थगित करू, असा इशारा त्यांनी दिला.

प्रतिक्रिया देताना उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदार पाटील (ETV Bharat Reporter)

सिल्लोड मतदारसंघात हजारो बोगस मतदार : सिल्लोड मतदारसंघात नऊ हजारांहून अधिक बोगस मतदार असल्याचा आरोप विठ्ठल बदार पाटील यांनी केला. ण्याच्या एका खासगी संस्थेमार्फत त्यांनी काढलेल्या माहितीनुसार, सिल्लोड मतदारसंघातील 8444 मतदारांची नावे दुबार, तिबार इतकंच नाही तर चौबार देखील नोंदवण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीमध्ये त्या मतदारांची नावं, त्यांनी दिलेला पत्ता, ते मतदान करत असलेले केंद्र यांची पूर्ण माहिती तपशीलवार मिळाली आहे. त्याचबरोबर बाजूला असलेल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील 727 मतदारांची नावं सिल्लोड मतदारसंघात देखील दर्शवत आहेत. त्यानुसार एकट्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात नऊ हजारापेक्षा जास्त मतदारांची नावं अनेकवेळा दिसून येत असल्यानं हे सगळे मतदार बोगस असल्याची तक्रार विठ्ठल बदार यांनी निवडणूक आयोगाकडं केली.

अब्दुल सत्तार यांच्यावर थेट आरोप : सिल्लोड मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेत असलेला राज्यातील एक मतदारसंघ आहे. येथे अब्दुल सत्तार हे विद्यमान आमदार आहेत. रणनीती आणि वक्तव्यांमुळं ते चांगलेच चर्चेत असतात. विशेषतः ते विरोधकांच्या निशाण्यावर असतात. या मतदारसंघातील मतदार यादीत असलेल्या बनावट नावांमध्ये देखील सत्ताधारी पक्षात असलेल्या सत्तार यांचाच हात आहे. त्यामुळं इतक्या तक्रारी करूनही निवडणूक आयोग कारवाई करत नसल्याचा आरोप विठ्ठल बदार यांनी केलाय.

Fake Voter
नऊ हजार बनावट मतदार (ETV Bharat Reporter)

न्यायालयात आव्हान देणार : सिल्लोड मतदारसंघात याआधी विधानसभा निवडणुकीत अवघ्या तीनशे ते चारशे मतांनी भाजपाचे उमेदवार सांडू पाटील लोखंडे यांचा पराभव झाला होता. अशा परिस्थितीत नऊ हजार दुबार मते निर्णायक ठरू शकतात. त्यामुळं दुबार आणि त्यापेक्षा जास्तवेळा असलेली नावं तातडीनं रद्द केली पाहिजेत. निवडणूक आयोगानं जे काम करायला पाहिजे ते काम आम्ही केलं. ही नावं वगळण्यासाठी एक दिवस लागेल, मात्र अद्याप आयोग ते करत नाही. पुढील काही दिवसात नावं वगळली गेली नाहीत, तर न्यायालयात धाव घेऊ, वेळ आली तर निवडणुकीवर स्थगिती आणणार असल्याचा इशारा विठ्ठल बदार यांनी दिलाय.

हेही वाचा -

  1. महायुतीच्या घटक पक्षात वैचारिक तणाव? धर्मनिरपेक्ष, हिंदुत्वावरुन खडाजंगी - Assembly Election 2024
  2. संगमनेरमध्ये वडलांची गरज नाही मीच भरपूर, थोरातांच्या आव्हानावर सुजय विखेंचा पलटवार - Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat
  3. लोकांना झुलवत ठेवणाऱ्यांना हक्क मागण्याचा नैतिक अधिकार नाही, राष्ट्रवादीच्या कॅम्पेनवर मुख्यमंत्र्यांची तिखट प्रतिक्रिया - CM Eknath Shinde

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.