पुणे Ajit Pawar : बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार आणि अजित पवार प्रचारासाठी फिरत आहेत. सुरुवातीला पार्थ पवारही दिसत होते. पण आता दिसत नाहीत असा प्रश्न केला असता अजित पवार आणि मिस्कीलपणे उत्तर दिलंय. ते म्हणाले की पार्थ पवार (Parth Pawar) हे गुप्त पद्धतीनं प्रचार करत आहेत.
राज ठाकरे आणि अमित शाह भेट : लोकशाहीमध्ये अनेक घटक मित्रपक्ष असतात. त्यामुळं राज ठाकरे जर महायुतीत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे, अशी पहिली प्रतिक्रिया अजित पवार यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीवर दिली आहे. तसंच सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे. सुप्रीम कोर्टाने आमच्या घड्याळ या निर्णयाबाबत जो निर्णय दिलाय तो आम्हाला मान्य आहे. ज्यावेळेस हा निर्णय दिला त्यावेळेपासून आम्ही लागू करत आहोत आणि आम्ही जाहिरातीमध्ये सुद्धा ते न्यायप्रविष्ठ प्रकरण आहे असं सांगू, असं अजित पवार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर म्हणाले आहेत.
लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार : विजय शिवतारे हे वैयक्तिक टीका करत आहेत. त्यावर बोलताना कोणी कोणावर टीका करू शकतो. लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मी मध्यंतरी ऐकलं त्यांचं आणि एकनाथ शिंदे यांचं बोलणं झालेलं आहे. ते त्यांचा निर्णय घेतील बाकी मी जास्त काही बोलणार नाही असं देखील अजित पवार विजय शिवतारे यांच्या बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हणाले.
बैठकीला केलं मार्गदर्शन : बारामती लोकसभेच्या खडकवासला मतदारसंघात आज अजित पवार यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी समन्वय बैठकीला मार्गदर्शन केलं. या बैठकीला चंद्रकांत पाटील, अजित पवार सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी या प्रश्नांना उत्तरे दिले आहेत.
हेही वाचा -
- Babasaheb Shinde : आमदार खासदार होण्यासाठी पठ्ठ्याने विकली तब्बल पन्नास एकर जमीन; २३ निवडणुका हरला, पुन्हा लोकसभा लढणार
- Sanjay Raut: राज ठाकरे यांच्या मनातील संवेदना मला अधिक माहिती, त्यांचे व्यंगचित्र बोलके - संजय राऊत
- Vijay Shivtare: शिवतारेंमुळं महायुतीत मिठाचा खडा? ...तर आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, अजित दादांच्या कार्यकर्त्यांचा इशारा