ETV Bharat / politics

अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानं महायुतीत मिठाचा खडा; अमोल मिटकरी यांचा बोलविता धनी कोण? - Dispute in Mahayuti - DISPUTE IN MAHAYUTI

Dispute in Mahayuti : महायुतीमधील नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार, अमोल मिटकरी (Amol Mitkari) सध्या त्यांच्या बेताल वक्तव्यामुळं चांगलेच चर्चेत आहेत. आता जागावाटपाच्या मुद्द्यावर भाष्य करून अमोल मिटकरी यांनी नवीन वादाला तोंड फोडलं आहे. यावरून महायुतीत राजकारण चांगलंच तापलं आहे.

Dispute in Mahayuti
दरेकर, मिटकरी, देसाई (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 6:00 PM IST

मुंबई Dispute in Mahayuti : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमत होण्याऐवजी काही नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळं चांगलीच जुंपली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections) अनुषंगानं जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या अनुषंगाने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार, अमोल मिटकरी (Amol Mitkari) सध्या त्यांच्या बेताल वक्तव्यामुळं चांगलेच चर्चेत आहेत. आता जागावाटपाच्या मुद्द्यावर भाष्य करून अमोल मिटकरी यांनी नवीन वादाला तोंड फोडलं आहे. यावरून महायुतीत राजकारण चांगलंच तापलं आहे. महायुतीच्या शिंदे शिवसेना गट आणि भाजपा नेत्यांनीही अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली असून राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना याबाबत जाब विचारला आहे.

महायुतीत मिठाचा खडा : जागा वाटपाच्या मुद्द्यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, महायुतीत आम्हाला जर का ५५ जागा मिळत असतील तर आम्ही समाधानी असणार नाही. महायुतीतील तिन्ही घटक पक्ष हे १०० जागांचा दावा करत आहे. जर का महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी १०० जागांची मागणी ताणून धरली तर अशा परिस्थितीत प्रत्येकाला वेगळी निवडणूक लढवावी लागेल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमोल मिटकरी यांचा अशा पद्धतीच्या विधानानं महायुतीत मिठाचा खडा पडला आहे.

मिटकरींची भूमिका अधिकृत आहे का : अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याबाबत बोलताना भाजपा नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे. त्यांना कोणी अधिकार दिला आहे का? त्यांची भूमिका अधिकृत आहे का? हे त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर करावं. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही. पण वारंवार त्यांचं असं वागणं हे महायुतीसाठी घातक आहे. त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष हे जेव्हा भूमिका मांडतील तेव्हा त्या भूमिकेबाबत विचार केला जाईल. त्याचबरोबर मिटकरी यांच्या मागे कोणी बोलवता धनी आहे का? हे सुद्धा तपासून पाहावं लागेल.

मिटकरींना समज देणं अत्यावश्यक : याबाबत बोलताना शिंदे गटाचे नेते, मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, अमोल मिटकरी यांनी असं वक्तव्य करण योग्य नाही. अशा पद्धतीनं जागा वाटपाची चर्चा मीडियामध्ये किंवा उघडपणे करायची नसते. याबाबत महायुतीचे जे वरिष्ठ नेते आहेत, मग ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महादेव जानकर, रामदास आठवले हे सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि जागा वाटपाबाबत निर्णय घेतील. अमोल मिटकरी यांनी असं वक्तव्य केल्यानं विनाकारण महायुतीमध्ये वाद निर्माण होतील. त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना समज देणं हे आता फार आवश्यक झालंय.

मिटकरी अगोदरही वादाच्या भोवऱ्यात : यापूर्वी सुद्धा भाजपा नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत अमोल मिटकरी यांनी बोलताना, पुण्यात ड्रग्ज आणि पब संस्कृतीला चंद्रकांत पाटील यांच्याच काळात उधाण आल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरून भाजपा नेत्यांनी त्यांना खडे बोल सुनावले होते. तो वाद शमत नाही तोच जागा वाटपाच्या मुद्द्यावर अमोल मिटकरी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं महायुतीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा -

  1. अजित पवार आले म्हणून लंगोट तरी वाचली, उशिरा आले असते तर...; अमोल मिटकरींचं रामदास कदमांना प्रत्युत्तर - Amol Mitkari On Ramdas Kadam
  2. "बीडच्या बप्पाचा दादांना फोन"; शरद पवार गटाच्या खासदाराबाबत अमोल मिटकरींचा मोठा दावा - Amol Mitkari On Bajrang Sonawane
  3. "अजित पवारांमध्ये कोणते गुण कमी होते?"; शरद पवारांच्या 'त्या' दाव्यानंतर अमोल मिटकरींचा सवाल - Lok Sabha Election

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.