नवी दिल्ली Jailed Russian Opposition Leader Navalny Dead : यामालो-नेनेट्स स्वायत्त जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, आज शुक्रवार (दि. 16 फेब्रुवारी) रोजी तुरुंगात फिरल्यानंतर अलेक्सी नवलनी यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांची तब्येत बरी नसल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर ते बेशुद्ध झाले. यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं. मात्र ते शुद्धीवर येऊ शकले नाहीत. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही असंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. ॲलेक्सबद्दल अनेकदा अफवा पसरल्या आहेत. याआधी 2020 मध्ये सायबेरियातही अलेक्सी यांना विष देऊन ठार केल्याची बातमी आली होती. मात्र, रशियन सरकारने त्यांना ठार मारण्याचा दावा फेटाळून लावला होता. त्यांना नर्व्ह एजंटने विषबाधा केल्याचा कोणताही पुरावा नाही, असंही सरकारनं म्हटलं होतं. यानंतर ते तुरुंगातून गायब झाल्याच्याही अफवा पसरल्या होत्या.
दंड वसाहत प्रकरण : जानेवारी 2021 मध्ये रशियाला परतल्यावर, 2013 मध्ये अलेक्सी नवलनींविरुद्ध फसवणुकीचं प्रकरण समोर आलं. त्यानंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यानंतर अलेक्सी यांनी आपल्याला राजकीयदृष्ट्या अडकवण्याचा हा प्रयत्न आहे असा थेट आरोप केला होता. अलक्सी यांनी युक्रेनविरुद्ध रशियाच्या बाजूने तुरुंगातून प्रचार केला होता. युद्धाला सार्वजनिक पतळीवर विरोध करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता. सीएनएनच्या म्हणण्यानुसार, जेव्हा अलेक्स नवलनी यांना ऑगस्टमध्ये दंड वसाहत प्रकरणात 19 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती, तेव्हा त्यांनी सांगितलं की या शिक्षेने मला काही फरक पडत नाही.
2017 मध्येही जीवघेणा हल्ला : 2017 मध्ये अलेक्स नवलनी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभं राहण्याचा प्रयत्न केला. परंतु, फसवणुकीच्या आरोपांमुळे त्यांना उभे राहता आलं नाही. अलेक्सी यांनी याला सरकारचं कारस्थान आहे असं म्हटलं होतं. जुलै 2019 मध्ये, त्यांना 30 दिवस तुरुंगात टाकण्यात आलं. कारण त्यांनी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती तुरुंगातच बिघडल्याने तुरुंगात विष घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं होतं.
पुतीन यांना विरोध : अलेक्सी नवलनी यांनी रशियामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध अनेक मोहिमा चालवल्या आहेत. या काळात ते अनेकवेळा तुरुंगातही गेले. 2011 मध्ये त्यांनी पुतिन यांच्या पक्षातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. पुतिन यांच्या पक्षाने संसदीय निवडणुकीत हेराफेरी केल्याचा त्यांचा आरोप होता. या आरोपानंतर त्यांना 15 दिवस तुरुंगात टाकण्यात आलं. 2013 मध्येही ते तुरुंगात गेले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र, सरकार जाणुनबुजून त्यांना अडकवत असल्याचा त्यांचा आरोप कायम आहे.
हेही वाचा :
2 पंतप्रधानांनी यूएईच्या अध्यक्षांशी केली चर्चा; पहिल्या हिंदू मंदिराचं मोदींच्या हस्ते उद्घाटन
3 अबुधाबीमध्ये पहिल्या BAPS हिंदू मंदिराचं मोदींनी केलं उद्घाटन