ETV Bharat / health-and-lifestyle

भारतातील तब्बल 22 कोटी नागरिक उच्चरक्तदाबाने ग्रस्त, 46 टक्के लोक असतात अनभिज्ञ - WORLD HYPERTENSION DAY 2024 - WORLD HYPERTENSION DAY 2024

World Hypertension Day 2024 : सामान्यपेक्षा जास्त रक्तदाब असणं म्हणजे उच्चरक्तदाब होय. उच्चरक्तदाबावर योग्य नियंत्रण न ठेवल्यास पीडित व्यक्तीची किडनी निकामी होऊ शकते. तसंच यामुळं हृदयविकाराचा झटका, ब्रेन हॅमरेज यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तसंच अनेकांना आपला जीवही गमवावा लागू शकतो. अनेकांना उच्चरक्तदाबचा त्रास असतो, परंतू याची माहिती नसते. उच्च रक्तदाबाशी संबंधित प्रत्येक पैलू समजून घेण्यासाठी संपूर्ण बातमी वाचा.

World Hypertension Day 2024
जागतिक उच्च रक्तदाब दिवस (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 12:35 PM IST

हैदराबाद World Hypertension Day 2024 : जगभरात आज 'उच्च रक्तदाब दिन' साजरा केला जातो. बदलत्या जीवन शैलीमुळं अनेकांच्या आरोग्यावर अनेक दुष्परपरिणाम होताना दिसत आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगातील 80 वर्षाखालील तब्बल 128 कोटी पेक्षा जास्त लोक उच्चरक्तदाबानं ग्रस्त आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील 22 कोटी लोक हे भारतातील असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे उच्चरक्तदाब? माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त रक्तदाब असणे म्हणजे उच्चरक्तदाब होय. उच्चरक्तदाब असलेल्या व्यक्तींच्या धमन्यांमध्ये तणाव निर्माण होतो. सामान्यत: रक्तदाब 120/80 असतो. 139/89 पर्यंतचा रक्तदाब हा पूर्ण रक्तदाब म्हणून ओळखला जातो. तसंच 140/90 पेक्षा जास्त रक्तदाब उच्च रक्तदाब असतो.

आकडेवारी काय सांगते? :

  • जागतिक आरोग्य संघटनेनं 16 मार्च 2023 ला प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार जगभरात 30-79 वर्षे वयोगटातील 1.28 अब्ज प्रौढ व्यक्ती उच्चरक्तदाबानं ग्रस्त आहेत. यापैकी बहुतेक दोन तृतीयांश कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात.
  • 46 टक्के लोकांना ते उच्चरक्तदाबानं ग्रस्त असल्याची महिती नसते.
  • उच्चरक्तदाब हे अकाली मृत्युचं कारण ठरतंय.
  • 2010 ते 2030 दरम्यान उच्चरक्तदाब 33 टक्क्यांनी कमी करणं हे जागतिक संघटनेचं लक्ष्य आहे.

उच्चरक्तदाबाचा दिनाचा इतिहास : उच्चरक्तदाबाबद्दल जनजागृती वाढविण्यासाठी जागतिक उच्च रक्तदाब लीगने (डब्ल्यूएचएल) 14 मे 2005 ला उच्च रक्तदाब दिन साजरा करण्यास सुरुवात केली. 2006 पासून दरवर्षी 17 मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून साजरा केला जातो.

यंदाची थीम : रक्तदाबाच्या प्रतिबंध, निदान आणि उपचारांविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा केला जातो. रक्तदाब अचूकपणे मोजा, त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घायुष्य जगा अशी यंदाची थीम आहे.

उच्चरक्तदाबाची कारणं :

  1. लठ्ठपणा
  2. आनुवंशिक कारणं
  3. अति मानसिक ताण
  4. आहारात जंक फूड आणि फास्ट फुडचा समावेश
  5. आहारात मिठाचं अधिक प्रमाण
  6. जेवणाची आणि झोपेची वेळ न पाळणे
  7. अतिरिक्त मद्य सेवन
  8. व्यायामाचा अभाव
  9. स्थूलता

'ही' आहेत लक्षणं : उच्चरक्दाबाची लक्षणं याबद्दल बरेच लोक अनभिज्ञ असतात. बहुतेकांना ते उच्चरक्तदाबानं ग्रस्त असल्याचं जाणवतही नाही. त्यामुळं नियमीत तपासणी करणं गरजेचं आहे. डोकेदुखी, छातीत जळजळ, डोळ्यासमोर अंधारी येणे हे उच्चरक्तदाबाची कारणं असू शकतात. रक्तदाबाचे त्वरीत उपचार न केल्यास संबंधीत व्यक्तींना किडनी रोग, हार्ट संबंधित समस्या तसंच स्ट्रोक येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं सौम्य प्रकारची लक्षणं जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  1. चिंता
  2. मळमळ होणे
  3. उल्टी होणे
  4. चक्कर येणे
  5. छातीत दुखणे
  6. नाकामधून रक्त वाहने
  7. गंभीर डोकेदुखी
  8. श्वास घेण्यास त्रास

काय करावे :

  • नियमीत व्यायाम करावा.
  • तंबाखू सेवन करु नये.
  • आहारात मीठाचं प्रमाण कमी ठेवावं.
  • जास्त वेळ बसून राहू नये.
  • आहारात फळं आणि हिरव्या पालेभाज्याचा समावेश करावा.
  • झोप चांगली घ्यावी.

हेही वाचा -

  1. मधुमेहींचा डायट चार्ट कसा असावा? जाणून घ्या सर्वकाही - Best Foods For diabetes
  2. जागतिक थॅलेसेमिया दिवसाचा इतिहास आणि महत्त्व घ्या जाणून ... - world thalassemia day 2024
  3. 'या' तीन कारणांमुळे कर्करोगाची होते सुरुवात; काय म्हणाले आरोग्य तज्ज्ञ ? - CANCER reasons

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.