Stress Management Tips: वर्तमान काळात मानसिक ताण ही गंभीर समस्या बनत चालली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्व जण कोणत्या ना कोणत्या कारणानं तणावग्रस्त आहेत. यामध्ये तरूणांची सख्या जास्त आहे. तणावामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. शिवाय शारीरिक आरोग्यही धोक्यात येतं. दीर्घकालीन तणावामुळे डोकेदुखी, उच्च रक्तदाब, हृदविकार, स्ट्रोक, मधुमेह, कर्करोग यासारख्या समस्या उद्भवतात. तसंच रोगप्रतिकार शक्ती देखील कमकुवत होते.
या समस्या होतात
- रोगप्रतिकराक शक्तीचा ऱ्हास: जे लोक मानसिक तणावानं त्रस्त असतात त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास सर्दी, ताप, खोकला तसंच संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता जास्त असते.
- कर्करोगाचा धोका: मानसिक तणावामध्ये असलेले व्यक्ती मद्यपान आणि धूम्रपान अतिप्रमाणात करतात. या घातक सवयींमुळे शरीर पोखरून निघतं. परिणामी कर्करोगाचा धोका वाढू शकतो. अशा घातक सवयीमुळे अशा व्यक्तींचा वेळेपूर्वीच मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.
- डोकेदुखी: कोरोना काळानंतर डोकेदुखीची समस्या झपाट्यानं वाढली. कोरोनानंतर केलेल्या एका संशोधनात असं आढळून आलं की, तणावामुळे लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या वाढत आहे. डोकेदुखीमुळे कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही. डोकेदुखीचे दुष्परिणाम वैयक्तक तसंच व्यावसायिक आयुष्यावर होते असं सशोधनात दिसून आलं.
- हृदय रोग: व्यक्ती मानसिक तणावामध्ये असल्यास हृदयासंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. तणावामुळे सर्वात आधी रक्तदाबाची समस्या उद्भवते. यामुळे हृदविकाराच झटका येण्याची शक्यता जास्त असते. तणावामुळे पुरेशा प्रमाणात झोप होत नाही. यामुळे देखील हृदविकाराचा झटका येवू शकतो.
- मधुमेह: तणावामुळे शरीरातील तणावाचे हार्मोन्स झपाट्यानं वाढतात. यामुळे इन्सुलिन तयार होण्याच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होतो. परिणामी रक्तातील साखरचं प्रमाण वाढते. यामुळे मधुमेहाचा धोका उद्भवतो.
तणाव कमी करण्यासाठी काय करावं
- नियमित व्यायाम किंवा योगा केल्यास तणाव कमी होवू शकतो.
- तणावग्रस्त व्यक्तीनं त्याच्या आहारामध्ये फळं, भाज्या, दूध, मांस यांचा समावेश करावा.
- दररोज व्यायाम केल्यास तणावाची समस्या दूर होवू शकते.
- मोबाईलमुळे तणाव वाढू शकतो. अतिप्रमाणात मोबाइलचा वापर केल्यास त्याचा परिणाम झोपेवर होतो.
- चांगली झोप घ्या कारण तणावाच्या रूग्णासाठी झोप फार महत्त्वाची आहे.
- दररोज किमान 30 मिनिट चाला. यामुळे तुम्ही तणावमुक्त जीवन जगू शकाल.
संदर्भ
https://www.cancer.gov/about-cancer/coping/feelings/stress-fact-sheet
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3341916/
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
हेही वाचा