Karva Chauth 2024: पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला अनेक उपवास करतात. मात्र, यामध्ये करवा चौथ हे व्रत अत्यंत खास आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला करवा चौथ साजरा केला जातो. यावर्षी रविवार, २० ऑक्टोबरला करवा चौथ साजरा केला जाईल. या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला उपवास करतात. रात्री पूजा केल्यानंतर आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर आपल्या पतीच्या हाताने पाणी ग्रहन करून उपवास सोडतात. या दरम्यान दिवसभर उपाशी राहिल्यामुळे महिलांना हायट्रेशनची समस्या होऊ शकते. तसंच अशक्तपणा जाणवू शकतो. दिवसभर हायड्रेशन लेव्हल सुरळीत ठेवण्यासाठी उपासापूर्वी खाली दिलेल्या टिप्स वापरून डिहायड्रेट होण्यापासून तुम्ही वाचू शकता.
- हे प्या
- लिंबू पाणी: शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी लिंबू पाणी सर्वोत्तम आहे. यामुळे शरीराला व्हिटॅमिन 'सी' मिळते. त्यासाठी एक ग्लास पाणी घ्या त्यात लिंबू पिळून चिमूटभर मीठ आणि साखर घाला आणि ते प्या. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसंच शरीराचं हायड्रेशन वाढते.
- नारळ पाणी: नारळ नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट आहे. यामुळे तुम्ही उपवास करण्यापूर्वी नारळ पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवू शकता.
- हर्बल टी: पुदिना आणि कॅमोमाइल चहा शरीराला हायट्रेट ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. शिवाय यामुळे पचनक्रिया देखील सुरळीत होते.
- हे खावं
- फळं खा: सरगीमध्ये तुम्ही संत्री, काकडी, खरबूज तसंच आवडीनुसार फळआहार घेवू शकता. ही फळ खाल्ल्यास तुम्ही दिवसभर हायड्रेटेड राहू शकता.
- ओट्स: सरगीमध्ये ओट्स खाणं उत्तम आहे. ओट्स पाणी शोषून घेतात.
- याशिवाय तुम्ही दही दूध आणि दूग्धजन्य पदार्थ खाऊ शकता. तसंच सुका मेवा आणि इतर पदार्थ खावून शरीर हाड्रेट ठेऊ शकता.
आजारी महिलांनी अधिक काळजी घ्यावी
- होमिओ केअर दिल्लीच्या होमिओपॅथी आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. साधना अग्रवाल यांच्या मते, केवळ उपवासाच्या वेळीच नाही, तर काही गोष्टी तीन-चार दिवस आधी लक्षात ठेवल्या तर या काळात तुम्ही विविध समस्यांपासून स्वत:चं रक्षण करू शकता.
- डॉ. साधना सांगतात की गरोदर महिलांनी करवा चौथचा उपवास करू नये. कारण, त्यामुळे माता आणि जन्मणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला उपवास करायचाच असेल तर दिवसभर रिकाम्या न राहता फळं, सुकामेवा, दूध, ताज्या फळांचं स्मूदी, फळांचं रस आणि नारळ पाणी घ्यावे.
- आम्लपित्त, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या महिला आणि गरोदर महिलांनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि शक्य असल्यास उपवास करू नये. तथापि, तरीही जर उपवास करत असाल तर दैनंदिन व्यवहाराकडे, आहाराकडे आणि डॉक्टरांनी सांगितलेली खबरदारी यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे.
- इतर खबरदारी: केवळ खाण्यापिण्याच्या सवयीच नाही तर काही वेळा आपल्या दैनंदिन जीवनशैलीतील कामांमुळे शरीरात उर्जेची कमतरता आणि इतर समस्या निर्माण होतात, असं डॉ. साधना सांगतात. उदाहरणार्थ, उपवासाच्या दिवशी, अनेक स्त्रिया भूक किंवा तहान टाळण्यासाठी उशिरा उठू शकतात. बऱ्याच स्त्रिया दिवसभरात आवश्यक असलेल्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहून स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु यामुळे अधिक ऊर्जा खर्च होते. या वर्तनामुळे राग किंवा चिडचिड देखील होऊ शकते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
हेही वाचा