ETV Bharat / health-and-lifestyle

देशभरात साजरा होतोय होळीचा सण; काय आहे शुभमुहूर्त, कधी करता येईल होळी दहन? - Holika Dahan Muhurat 2024 - HOLIKA DAHAN MUHURAT 2024

Holika Dahan Muhurat 2024 : आज होळी दहन आहे. होळीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. चला जाणून घेऊ होळी दहनाशी संबंधित काही खास गोष्टी.

देशभरात साजरा होतोय होळीचा सण; काय आहे शुभमुहूर्त, कधी करता येईल होळी दहन?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 11:52 AM IST

हैदराबाद Holika Dahan Muhurat 2024: आजपासून देशभरात रंगांचा सण होळीची सुरुवात होळी दहनानं होणार आहे. यावेळी होळी दहन रात्री 11.14 ते 12.14 पर्यंत अतिशय शुभ असेल. त्याच वेळी, गर्भवती महिला आणि नववधूंसाठी होळी दहन पाहणं अशुभ असणार आहे. काशीचे पंडित दैवज्ञ कृष्ण शास्त्री यांच्या माहितीनुसार आज भद्रा सकाळी 9.56 ते रात्री 11.14 पर्यंत असेल. भद्रानंतर शुभ मुहूर्तावर (सर्वार्थसिद्धी योग) होळी दहन करणं शुभ ठरेल. होळी दहनासाठी रात्री 11.14 ते 12.14 ही वेळ अत्यंत शुभ आहे. होळी (धुलीवंदन) हा सण 25 मार्च म्हणजेच सोमवारी साजरा केला जाणार आहे.

गरोदर स्त्रिया, नवविवाहित स्त्रिया आणि लहान मुलांनी होळी दहन पाहू नये : असं मानलं जातं की गर्भवती महिलेनं होळी दहन पाहिल्यास तिच्यावर आणि जन्मलेल्या बाळावर अशुभ प्रभाव पडतो. त्यामुळं तिनं होळी दहन पाहू नये. तसंच नवविवाहित वधूनं होळी दहन पाहिल्यास तिच्या वैवाहिक जीवनावर अशुभ परिणाम होतो. या कारणास्तव त्यांनी होळी दहनापासूनही दूर राहावं. सासू आणि सुनेनं सोबत होळी दहन एकत्र पाहू नये, असाही समज आहे. त्यामुळं त्यांच्यातील प्रेम कमी होतं. ज्यांना एकुलता एक मुलगा आहे, त्यांनीही होळी दहन पाहू नये. ज्येष्ठांनी त्यांच्या जागी पूजा करावी. नवजात बालकं आणि लहान मुलांनाही होळीकाजवळ नेऊ नये. होळी दहन दरम्यान नकारात्मक शक्तींचा धोका असतो, त्याचा परिणाम मुलांवर होऊ शकतो. हे टाळले पाहिजे, अशी धारणा आहे.

होळीची भस्म अशुभ शक्तींपासून रक्षण करते : असं मानलं जातं की होळीची उरलेली अग्नी आणि भस्म घरी आणल्यानं अशुभ शक्तींपासून संरक्षण होते. ही राख अंगावरही लावता येते. हे शुभ परिणाम देते.

(टीप : या बातमीत दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि दाव्यांवर आधारित आहे. ईटीव्ही भारत कोणत्याही दाव्याचं समर्थन करत नाही.)

हेही वाचा :

  1. जळगावात मुस्लिम कुटुंब वाढवतंय होळीचा गोडवा; पाच पिढ्यांपासून सुरू आहे काम - Holi 2024
  2. ठाण्यात जादुई रंगपंचमी; होळीसाठी बाजारपेठेत "कलर लगाओ, कलर भगाओ छू मंतर" - Holi Festival 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.