ETV Bharat / entertainment

यामी गौतम आणि आदित्य धर झाले पालक, केली पोस्ट शेअर - Yami Guatam and aditya dhar - YAMI GUATAM AND ADITYA DHAR

Yami Guatam : यामी गौतमनं एका मुलाला जन्म दिला आहे. तिनं आज सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

Yami Guatam
यामी गौतम (यामी गौतम (Yami Guatam - instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 2:12 PM IST

मुंबई - Yami Guatam : 'विकी डोनर' फेम अभिनेत्री यामी गौतम आता चर्चेत आली आहे. यामीनं 'आर्टिकल 370' च्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी दिग्दर्शक पती आदित्य धरबरोबर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. 'आर्टिकल 370' हा चित्रपट 23 फेब्रुवारीला रिलीज झाला होता. दरम्यान आज 20 मे रोजी यामीनं तिच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिनं तिच्या एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं आई झाल्याचं सांगितलं आहे. यामीनं एका सुंदर मुलाला जन्म दिला आहे. पोस्ट शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "आम्ही पालकत्वाच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करत असताना, आमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आतुर आहोत. तो आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी तसेच आपल्या राष्ट्रासाठी अभिमानाचा दीपस्तंभ बनेल अशी आशा आहे."

यामी गौतमनं दिला मुलाला जन्म : तसेच पोस्टवर तिनं सांगितलं. "10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी मी मुलाला जन्म दिला. त्याचं नाव वेदविद आहे, म्हणजे वेद चांगले जाणणारा. तुम्ही त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करा." आता तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिचे चाहते तिच्यावर अभिनंदाचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "खूप खूप शुभेच्छा तू काळजी घे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "मी तुझ्यासाठी खूप खुश आहे, अभिनंदन." आणखी एकानं लिहिलं, "तुमच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा, चांगली बातमी दिली." आता या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्ट हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

यामी गौतम 'आर्टिकल 370'नंतर लाइमलाइटपासून दूर : यामी गौतम शेवटी 'आर्टिकल 370' या चित्रपटामध्ये दिसली होती. यानंतर ती लाइमलाइटपासून दूर आहे. 'आर्टिकल 370' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली असून समीक्षकांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केलं होतं. या चित्रपटात यामी गौतम व्यतिरिक्त वैभव तत्ववादी, प्रियामणी, इरावती हर्षे, मोहन आगाशे, अरुण गोविल, राज अर्जुन, दिव्या शेठ, स्कंद ठाकूर, सुमीत कौल, शिवम खजुरिया, किरण करमरकर आणि इतर कलाकार दिसले आहेत. 'आर्टिकल 370' चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य जांभळे यांनी केलं होतं. या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, आदित्य धर यांनी केली आहे.

हेही वाचा :

  1. 'देवरा पार्ट 1' मेकर्सनं नवीन पोस्टर शेअर करून ज्युनियर एनटीआरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Jr NTR Birthday
  2. जान्हवी, फरहान, राजकुमार रावसह बॉलिवूड सेलेब्रिटींनी मुंबईत केलं मतदान - Lok Sabha Election 2024
  3. 'रामायण'मधील रावणासाठी तयार होणार खऱ्या सोन्याचा पोशाख - nitesh tiwari upcoming film

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.