ETV Bharat / entertainment

स्त्री सुरक्षा आणि प्रतिष्ठेसाठी कमल हासनचे आवाहन, तर चिरंजीवीने 'जगाची प्राणशक्ती' म्हणून केला गौरव - Kamal Haasan and Chiranjeevi

Womens Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कमल हसन आणि चिरंजीवीने सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. कमलने महिलांना सुरक्षा आणि प्रतिष्ठा देण्याचं आवाहन केलंय तर चिरंजीवीनं त्याच्या आयुष्यातील सर्व महिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीय.

Kamal Haasan and Chiranjeevi
कमल हसन आणि चिरंजीवी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 1:17 PM IST

मुंबई - Womens Day 2024: 8 मार्च रोजी जगभरात साजरा होत असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, अभिनेता आणि चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर महिलांचे योगदान आणि त्यांच्या त्यागाबद्दल कौतुक केलं आहे. हा दिवस स्त्रियांचे कर्तृत्व आणि अपार कष्टासाठी त्यांच्या सन्मानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. समाज आणि संस्कृतीला योग्य आकार आणि दिशा देण्याबाबत स्त्रीयांच्या भूमिकेला दिली जाणारी मान्यता समजली जाते.

कमल हासनने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये एक हृदयस्पर्शी संदेश लिहून आपल्या जीवनात असलेल्या सर्व महिलांचे योगदान अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांच्या प्रतिष्ठेचा आदर आणि त्यांच्या सुरक्षेबद्दलची जबाबदारी स्वीकारण्याचेही आवाहन त्यांनी पुरुषांना केले आहे. यानिमित्ताने कमल हासनने स्त्रीवाद स्वीकारण्याचे आणि सर्वांना समान हक्क देण्याचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

कमल हासन याने त्याच्या एक्स या सोशल मीडिया हँडलवर तमिळ भाषेत संदेश लिहिला असून याचे मराठी रुपांतर पुढीलप्रमाणे आहे. "आपल्या आयुष्यात असलेल्या महिलांचे योगदान आणि त्याग याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही. प्रत्येक पुरुषाने त्यांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रण केला पाहिजे. आपल्या जीवनात स्त्रीवादाचा स्वीकार करुयात. सर्वांना समान हक्कासाठी लढणाऱ्या महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा."

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीनेही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कमल हासन प्रमाणेच त्यानं महिलांना जगाची जीवन शक्ती म्हटलं आहे. ज्या महिलांनी त्याला त्याच्या आयुष्यात साथ आणि प्रेरणा दिली त्या सर्वांबद्दल त्यानं कृतज्ञता व्यक्त केली आहे.

"जगातील सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही या जगाची प्राणशक्ती आहात. तुम्ही प्रत्येक टप्प्यावर गती आणि प्रेरणा देत राहा. माझ्या पंखांना बळ देणाऱ्या आयुष्यात आलेल्या सर्व महिलांचा मी खास करुन उल्लेख करतो.", असे चिरंजीवीने लिहिले आहे.

चित्रपटाच्या आघाडीवर कमल हासन 'इंडियन 2' या चित्रपटात काम करत आहे. 1996 मध्ये आलेल्या 'इंडियन' या चित्रपटाचा हा सक्वेल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर करत आहेत. याशिवाय मणिरत्नम यांच्या 'ठग लाईफ' या चित्रपटातही तो काम करत आहे. प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातही कमल हासनची भूमिका आहे. दिग्दर्शक अनबरीव यांच्या आगामी चित्रपटातही त्याची भूमिका आहे.

चिरंजीवीच्या वर्कफ्रंटचा विचार करता वसिष्ठ दिग्दर्शित 'विश्वंभरा' या काल्पनिक सोशल ड्रामा चित्रपटाचे शूटिंग त्यानं सुरू केलंय. या चित्रपटात त्रिशा कृष्णन आणि वेनेला किशोर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -

  1. महिला दिनी कतरिना कैफच्या चाहत्यांसाठी मोठी भेट, 'मेरी ख्रिसमस'चे ओटीटीवर स्ट्रिमिंग सुरू!
  2. नयनतारानं जुळे मुले आणि पती विग्नेश बरोबरचा फोटो शेअर करुन दिला घटस्फोटाच्या अफवांना पूर्ण विराम
  3. महिला दिनानिमित्ताने श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे स्टारर 'गुलाबी' चित्रपटाची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.