ETV Bharat / entertainment

जंगी स्वागतानंतर घरी परतलेल्या मुनावर फारुकीच्या मुलांनं केलं बाबाचं कौतुक - बिग बॉस 17

bigg boss 17 : 'बिग बॉस-17'चा विजेता मुनावर फारुकीनं मुलगा मिकेलचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याचा मुलगा 'बिग बॉस'च्या ट्रॉफीकडे पाहत हसताना दिसत आहे.

bigg boss 17
बिग बॉस 17
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 11:09 AM IST

मुंबई - bigg boss 17 : अभिनेता सलमान खानचा सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस'चा सीझन 17 हा खूप चर्चेत होता. हा शो 'डोंगरीचा राजा' स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकीने जिंकला आहे. मुनावरनं या शोमध्ये जिंकलेली ट्रॉफी घरी आणली असून आता तो 'बिग बॉस 17' जिंकण्याचा आनंद लुटत आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो मुलगा मिकेलसोबत केक कापताना दिसत आहे. याशिवाय मुनावरनं त्याच्या इंस्टास्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याचा मुलगा हा बिग बॉसच्या ट्रॉफीकडे पाहत हसताना दिसत आहे. मुनावरनं बिग बॉस 17' जिंकल्यानंतर त्याचे अनेक चाहते खूश आहेत.

मुनावर फारुकी 'बिग बॉस 17'चा विजेता : 'बिग बॉस 17' ताज आपल्या नावावर केल्यानंतर मुनावरनं आपल्या चाहत्यांना एक भेट दिली. खडतर स्पर्धेदरम्यान 'डोंगरीचा राजा' मुनावरनं 'उदारियां' अभिनेता अभिषेक कुमारला पराभूत करून फायनल जिंकले. बिग बॉस ट्रॉफी जिंकल्यानंतर तो जेव्हा त्याच्या राहत्या ठिकाणी डोंगरी येथे पोहोचला, तेव्हा चाहत्यांनी त्याचं भव्य स्वागत केलं. मुनावर फारुकीनं इंस्टाग्राम एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यानं 'बिग बॉस'च्या घरात घालवलेले काही क्षण दाखविण्यात आले आहेत. याशिवाय नंतर तो आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी जाताना दिसत आहेत.

bigg boss 17
बिग बॉस 17

मुनावर फारुकी मानलं सलमान खान आणि चाहत्यांच आभार : विजयानंतर लगेचच, मुनावरनं होस्ट सलमान खानसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. यावर त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''तुमच्या प्रेमसाठी आणि समर्थनासाठी खूप खूप आभार, ट्रॉफी अखेर डोंगरीमध्ये आली आहे. तुमच्या मार्गदर्शनाबद्दल सलमान खान सर यांचे विशेष आभार.'' बिग बॉस' शोदरम्यान त्याला त्याच्या चाहत्यांनी खूप पाठिंबा दिला आहे. 'बिग बॉस 17'पूर्वी मुनावर फारुकीनं कंगना राणौतचा रिॲलिटी शो 'लॉक अप'चा ताजही जिंकला आहे. 'बिग बॉस' शोनंतर त्याची प्रचंड फॅन फॉलोईंग वाढली आहे.

हेही वाचा :

  1. 'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ यांच्या कला जीवनातील जाणून घ्या टर्निंग पॉइंट, बहुरुपी अभिनयापासून झाले विनोदाचा बादशाह!
  2. मकबूलची 20 वर्षे : नजरेमुळे मिळाली इरफानला भूमिका तर 'सत्या'मुळे मुकला मनोज बायपेयी
  3. भुवन बामनं दिल्लीत खरेदी केलं 11 कोटीचं घर ?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.