ETV Bharat / entertainment

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यूकेला होऊ शकतात स्थायिक ; रेडिटवर केला दावा - virat kohli and anushka sharma

Virat Kohli and Anushka Sharma : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यूकेला स्थायिक होऊ शकतात असा दावा आता रेडिट या सोशल मीडिया साईटवर केला जात आहे. सध्या याबद्दल इतर सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहेत.

Virat Kohli and Anushka Sharma
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 5:31 PM IST

मुंबई - Virat Kohli and Anushka Sharma : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे नुकतेच दुसऱ्या मुलाचे पालक झाले आहेत. अनुष्कानं 15 फेब्रुवारीला लंडनमध्ये मुलाला जन्म दिला. या जोडप्यानं सोशल मीडियावरून एका पोस्टद्वारे ते पालक झाल्याचं सांगितलं होतं. दरम्यान या जोडप्यानं आतापर्यत त्यांच्या मुलाची झलक चाहत्यांना दाखवलेली नाही. आता विराट हा मायदेशी परतला आहे, तर अनुष्का लंडनमध्ये तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. काही कारणमुळे विराट भारतात आल्याचं समजत आहे. विराट आणि अनुष्का आता आपल्या सुखी कुटुंबासह लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याचा दावा रेडिटवर केला जात आहे.

Virat Kohli and Anushka Sharma
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल : एका यूजरनं लिहिलं आहे की, ''मी काय ऐकतोय, खरंच असं आहे का?'' याला उत्तर देताना एकानं लिहिलं, ''होय, तुमच्याकडे पैसा असल्यानं तुम्ही लंडनमध्ये शांततेनं आयुष्य जगू शकता, नागरिकत्वासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागतील आणि काही पैसेही खर्च करावे लागतील. याआधी अनुष्कानं सांगितलं होत की ती गृहिणी म्हणून राहणार आहे.'' आणखी एक युजरनं या पोस्टवर लिहिलं, ''मी विराट आणि अनुष्काला लंडनमध्ये पाहिले, त्यांना पाहून असे वाटते की, अनुष्काला लंडनमध्ये स्थायिक व्हायचा आहे.'' आता विराट कोहली आयपीएल खेळण्यासाठी भारतात आला आहे.

अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई : अनुष्का ही विराटबरोबर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दिसलेली नाही. या जोडप्यानं फेब्रुवारीमध्ये गोड बातमी देऊन चाहत्यांना खुश केलं होतं. या जोडप्यानं एक पोस्ट जारी करत लिहिलं होत की, ''तुम्हा सर्वांना सांगताना आनंद होत आहे की, 15 फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या वामिकाच्या लहान भावाचे अकायचे स्वागत केले आहे. आता आम्हाला आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा पाहिजे आहेत. यावेळी आम्ही तुम्हाला आमच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन करत आहे.' अनुष्का शर्मा वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'चकडा एक्सप्रेस' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा आहे जो ओटीटी रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. Elvish yadav : एल्विश यादवनं रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्या प्रकरणी दिली कबुली, वाचा बातमी
  2. Shweta Bachchan : श्वेता बच्चनच्या वाढदिवसाच्या पार्टीत ऐश्वर्या आणि अभिषेक बेपत्ता
  3. Arbaaz Confirms Dabangg 4 : अरबाजचा 'दबंग 4' निर्मितीसाठी दुजोरा, मात्र अ‍ॅटलीशी भेटीचे केलं खंडन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.