ETV Bharat / entertainment

विजय देवरकोंडानं शेअर केले 'हॅट फेज' फोटो; चाहत्यानी विचारलं फोटो 'स्वीटहार्ट मंदान्ना'नं काढले का? - VIJAY DEVERAKONDA HAT PHASE 2024 - VIJAY DEVERAKONDA HAT PHASE 2024

VIJAY DEVERAKONDA HAT PHASE 2024 - विजय देवरकोंडाच्या ताज्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, त्याची "हॅट फेज" दिसत आहे. मात्र चाहत्यांमध्ये यामुळे वेगळीच खळबळ उडाली आहे. कारण त्यांना असं वाटतय की त्याची फास्टफ्रेंड असलेली रश्मिका मंदान्नानं हे फोटो काढलेत.

विजय देवरकोंडा रश्मिका मंदान्ना
विजय देवरकोंडा रश्मिका मंदान्ना (IANS, ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2024, 5:10 PM IST

Updated : Aug 30, 2024, 5:20 PM IST

हैदराबाद VIJAY DEVERAKONDA HAT PHASE 2024: तेलुगू अभिनेता विजय देवरकोंडा याने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगवेगळा पैलू दिसत आहे. विजयनं त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो टाकलेत आणि फक्त कॅप्शन दिलय, "माय हॅट फेज. 2024." या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या फोटोंमध्ये विजयनं विविध प्रकारच्या टोप्या घातल्या आहेत. कॅज्युअल बीनी असो किंवा सुवेव्ह फेडोरा, देवराकोंडाचा हॅट गेम काही औरच दिसून येत आहे.

सोशल मीडियावर त्याच्या फोटोवर मात्र वेगळ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. त्याच्या फॅशन सेन्सला चाहते दाद देत नाहीत तर ते वेगळ्याच विषयाची चर्चा करताना दिसतात. पोस्ट टाकल्याबरोबर, चाहत्यांनी विजय देवराकोंडाची कथित गर्लफ्रेंड रश्मिका मंदान्नाकडे या फोटोंचं क्रेडिट दिलं आहे. त्यांची प्रतिक्रिया अशी आहे, "कॅमेरा वुमन इज रश्मिका मंदान्ना," "अब रश्मिका की पोस्ट आयेगी थोडी देर मे..." आणि "रश्मिकाला प्रथम कोण पाहते हे एखाद्या स्पर्धेसारखे आहे" यासारख्या टिप्पण्या या फोटोंवर आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल सध्या सुरू असलेल्या चर्चांना अधिकच हवा मिळत आहे.

विजय देवराकोंडा आणि मंदान्ना अनेकदा एकत्र दिसून आले आहेत. त्यांची सोशल मीडियावरची एकत्र उपस्थिती शंकेला आणखीन वाव देते. दोघांपैकी कोणीही त्यांच्या नातेसंबंधाबाबत पुष्टी केली नसली तरी, दोघांमधील गुफ्तगुच्या अफवा चाहत्यांना सुतावरुन स्वर्ग गाठण्यास काही कमी पडत नाहीत.

विजय देवराकोंडा त्याच्या आगामी स्पाय ॲक्शन थ्रिलरसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. सध्या याचं नाव तात्पुरते VD12 असं ठेवण्यात आलय. देवरकोंडाच्या या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालं. त्यावर लगेचच मंदान्नाने फायर इमोजीसह त्याच्या पहिल्या लूकवर प्रतिक्रिया दिली होती. गौतम तिन्ननुरी दिग्दर्शित, VD12 28 मार्च 2025 रोजी रुपेरी पडद्यावर येणार आहे.

हेही वाचा..

  1. विजय देवेरकोंडा प्रेमविवाह करणार, पण...: व्हिडिओ व्हायरल - vijay deverakonda
  2. कथित लव्हबर्ड्स रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाची आशिष रेड्डीच्या रिसेप्शनला स्टाईलमध्ये एन्ट्री
  3. विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर स्टारर 'फॅमिली स्टार' लवकरच होणार ओटीटीवर रिलीज - family star

Last Updated : Aug 30, 2024, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.