मुंबई : गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकावर २७ फेब्रुवारी २००२ रोजी घडलेल्या घटनेवर आधारित 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये 'ट्वेल्थ फेल' अभिनेता विक्रांत मॅसी आणि राशी खन्ना पत्रकारांच्या भूमिकेत असून या घटनेचे गूढ उकलताना हे दोघेही दिसणार आहेत. गोध्रा स्थानकावर साबरमती एक्स्प्रेसला आग लागली आणि त्यात अयोध्येहून परतणाऱ्या अनेक भाविकांना आपला प्राण गमवावा लागला होता.
'द साबरमती रिपोर्ट'च्या टीझरमध्ये काय आहे ? : 'द साबरमती रिपोर्ट'च्या टीझरची सुरुवात न्यायालयाच्या खोलीपासून होते, जिथे विक्रांत या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांनी जाहीर माफी मागावी, याबद्दलची मागणी करतो. पार्श्वभूमीवर निवेदक म्हणतो की, "प्रत्येक देशाच्या इतिहासात एक वेळ अशी येते की, सर्वकाही बदलून जाते. अमेरिकेसाठी तो 9/11 होता आणि अशीच वेळ भारतासाठी ठोठावणार होती." त्यानंतर 27 फेब्रुवारी 2002 रोजी झालेल्या साबरमती घटनेची एक झलक दाखवली जाते. यामध्ये जनता संतापाली असल्याची दिसते.
टीझरमधील दमदार संवाद : टीझरमधील विक्रांतचे संवाद खरोखरच अप्रतिम आहेत. साबरमती घटनेची झलक दाखवल्यानंतर विक्रांतचा एक डायलॉग आहे, ज्यात तो म्हणतो, "गोध्रा घटनेचं सत्य खाऊन बसले, एक दिवस देशामधील छोटे मुले देखील तुमच्याकडून जाब विचारेल." ज्यानंतर राशीचा डायलॉग आहे, "या देशाची जनता संतापानं भरली आहे, एक ठिणगी लागेल आणि लाखो घरे जळतील." टीझरच्या शेवटी, कोर्ट रुममध्ये विक्रांतचा एक सीन आहे ज्यामध्ये तो म्हणतो, "आपला देश जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, न्यायाधीश साहेब, आजच्या भारत उत्तर देखील देऊ शकतो, याशिवाय प्रश्न सुद्धा विचारू शकतो."
विक्रांत आणि राशी बेधडक पत्रकाराच्या भूमिकेत : 'ट्वेल्थ फेल'मध्ये आपल्या कामगिरीनं सर्वांची मनं जिंकल्यानंतर, विक्रांत मॅसीनं 'द साबरमती रिपोर्ट'मध्येही जबरदस्त काम करेल, असे आता टीझर पाहून अनेकजण म्हणत आहेत. या चित्रपटात तो एका पत्रकाराच्या भूमिकेत असून तो पहिल्यांदा साऊथ अभिनेत्री राशि खन्ना स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात 'जवान' फेम रिद्धी डोगराही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. 'द साबरमती रिपोर्ट' एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्या बालाजी मोशन पिक्चर्स आणि विकीर फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रंजन चंदेल यांनी केलंय. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.