मुंबई - The Crew teaser : करीना कपूर खान, तब्बू, क्रिती सेनॉन आणि दिलजीत दोसांझ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'द क्रू' या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुक्रवारी चित्रपटाच्या पहिल्या टीझरचे लॉन्चिंग केले. राजेश कृष्णन दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर आणि रिया कपूर यांनी केली आहे. हा चित्रपट 29 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
इंस्टाग्रामवर करीनाने टीझर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, "तुम्ही पॉपकॉर्न तयार करा आणि सर्व्ह करण्यासाठी सज्ज रहा. द क्रू या मार्चमध्ये थिएटरमध्ये रिलीज होत आहे!" चित्रपटाच्या पहिल्या टीझरमध्ये करीना, क्रिती आणि तब्बू तिघी मिळून विमानाच्या दिशेने जाताना दिसतात. तिघींनीही लाल रंगाचा केबिन क्रूचा गणवेश घातला असून त्यांची कॅमेऱ्याकडे पाठ आहे.
'द क्रू' चित्रपटामध्ये केबिन क्रू असलेल्या तीन स्त्रियांची कथा दाखवण्यात आली आहे. विमान व्यवसायात असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बनलेला हा एक विनोदी चित्रपट आहे. त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या परिस्थितीने ते एका वादाच्या भोवऱ्यात सापडतात आणि एका खोट्या सापळ्यात अडकतात. प्रासंगिक विनोदाची फोडणी असलेल्या या कथानकात दिग्गज अभिनेत्री आपल्या प्रतिभेची नवी चमक दाखवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
'द क्रू' चित्रपटामध्ये कपिल शर्मा छोट्या भूमिकेत दिसणार आहे. आधी ठरलेल्या निजोजनानुसार हा चित्रपट 22 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु चित्रपट निर्मात्यांनी रिलीजची तारीख एका आठवड्याने पुढे ढकलणे पसंत केले. दरम्यान, करीना आगामी रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे, त्यात अजय देवगण, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दुसरीकडे, क्रिती सेनॉन आगामी 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या रोमान्स ड्रामा चित्रपटामध्ये शाहिद कपूरसोबत दिसणार आहे. अभिनत्री तब्बू आगामी चित्रपट 'औरों में कहाँ दम था'मध्ये अजय देवगणसोबत काम करत आहे. हा चित्रपट नीरज पांडेने दिग्दर्शित केला आहे.
हेही वाचा -