ETV Bharat / entertainment

तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना स्टारर 'अरमानाई 4' होईल हिंदीमध्ये रिलीज - tamannaah bhatia - TAMANNAAH BHATIA

Tamannaah and Raashi : तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना अभिनीत 'अरमानाई 4' हा हिंदीमध्ये 24 मे रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटानं तमिळ आवृत्तीमध्ये जबरदस्त कमाई केलीय.

Tamannaah and Raashi
तमन्ना आणि राशी (Aranmanai 4 trailer: Sundar C, Tamannaah Bhatia, Raashii Khanna promise to take you on a thrill ride)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 6:23 PM IST

मुंबई - Tamannaah and Raashi : अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना स्टारर तमिळ चित्रपट 'अरनमानाई 4' या 3 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तमिळमध्ये खळबळ माजवल्यानंतर 'अरनमानाई 4' हिंदीत प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना यांचे चाहते हिंदीत प्रदर्शित होण्याची वाट पाहात आहेत. हा चित्रपट हिंदीत 24 मे रोजी प्रदर्शित होईल. तुम्ही जवळच्या चित्रपटगृहांमध्ये हिंदीतील हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. दरम्यान तमिळ आवृत्तीला प्रेक्षकांबरोबर समीक्षकांनीही भरभरून दाद दिली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'अरमानाई 4' होईल हिंदीत रिलीज : 'अरमानाई 4'नं बॉक्स ऑफिसवर 70 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे आणि लवकरच हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. अरमानाई फ्रँचायझीमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना अभिनीत या अरमानाई 4'नं रिलीजच्या 10 दिवसांतच बजेट वसूल केलं होतं. हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होणार असल्यानं निर्मात्यांना 'अरमानाई 4'कडून खूप अपेक्षा आहेत. तमन्ना आणि राशीचा अभिनय अनेकांना आवडला आहे. या चित्रपटासाठी या दोघींचं देखील कौतुक केलं जात आहे. याशिवाय या चित्रपटामधील 'अच्छाचो' गाण्यालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं आहे.

तमन्ना आणि राशीचा वर्कफ्रंट : या सुपरहिट चित्रपटात तमन्ना आणि राशीशिवाय सुंदर सी, रामचंद्र राजू, संतोष प्रताप, कोवई सरला, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश, दिल्ली गणेश आणि के. एस. रविकुमारसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अवनी सिनेमॅक्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन सुंदर सी यांनी केलं आहे. दरम्यान या अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तमन्ना 'दॅट इज महालक्ष्मी', 'वेदा' , 'ओडेला २', 'कथु करुप्पु' आणि 'एंद्रु काधल एनबेन' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे राशी ही 'सरदार 2', 'द साबरमती रिपोर्ट' आणि 'तेलुसू कडा' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. भावड्या 36 वर्षातही बदलला नाही : विकी कौशलला वाढदिवसानिमित्त सनीनं दिल्या हटके शुभेच्छा! - Vicky Kaushal Birthday
  2. 'सरफरोश'ची 25 वर्षे : नवाजुद्दीन सिद्दीकीनं शेअर केला आमिर खानबरोबर काम करण्याचा अनुभव - 25 years of Sarfarosh
  3. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशी रौतेलाचा जलवा, दीपिका पदुकोणच्या लूकची करुन दिली आठवण - urvashi rautela

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.