मुंबई - अभिनेता सनी देओल हिंदी सिनेसृष्टीत देशभक्तीचं प्रतिक बनला आहे. 'गदर 2' चित्रपटाला मिळालेल्या अफाट यशानंतर तो नव्यानं प्रकाशझोतात आला आहे. आज सनी देओल आपला 67 वा वाढदिवस साजरा करताना त्याच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. तो गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित आणि 'पुष्पा' आणि 'रंगस्थलम' सारख्या हिट चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रॉडक्शन हाऊससाठी आगामी चित्रपटात काम करणार असल्यामुळे चाहत्यांचे वाढदिवसा निमित्तच्या घोषणेकडे विशेष लक्ष लागून राहिलं होतं.
सनी देओल अभिनीत आगामी चित्रपटाचं शीर्षक 'SDMG' असं ठरलं होतं. हा एक अॅक्शनपॅक्ड ड्रामा चित्रपट असणार आहे. सनी देओलच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त, निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि शीर्षक लॉन्च केले. 'SDMG' हे शीर्षक सनी देओल मालिनेनी गोपिचंद यांच्या आद्याक्षरांवरुन ठरवण्यात आलं होतं. मात्र आता या चित्रपटाचं अधिकृत शीर्षक 'जाट' असं ठरवण्यात आलं आहे.
Introducing the man with a national permit for MASSIVE ACTION 💥💥@iamsunnydeol in and as #JAAT ❤️🔥#SDGM is #JAAT 🔥
— Mythri Movie Makers (@MythriOfficial) October 19, 2024
Happy Birthday Action Superstar ✨
MASS FEAST LOADING.
Directed by @megopichand
Produced by @MythriOfficial & @peoplemediafcy #HappyBirthdaySunnyDeol… pic.twitter.com/zbGDsZgMjq
आता अधिकृतपणे जाट म्हणून घोषित करण्यात आले आहे. 2025 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या शनिवार रविवारी रिलीज होणार असलेल्या या चित्रपटाचे शीर्षक आणि पहिला लूक उत्साह वाढवणारा आहे. प्रजासत्ताक दिनी रिलीज करण्यामागे एक निश्चित धोरण निर्मात्यांचं आहे. चित्रपटाची देशभक्तीपर थीम आणि सनीच्या लार्जर-दॅन-लाइफ हिरो इमेजशी याचा मेळ घातला जाणार आहे.
एक्स (ट्विटर) वर टीम एसडीएमजीने सनी देओलला त्याच्या वाढदिवसानिमित्त एका घोषणेसह शुभेच्छा दिल्या आहेत. यात निर्मात्यांनी पुढं लिहिलंय की, "मॅसिव अॅक्शनसाठी नॅशनल परमिट असलेल्या माणसाची ओळख करून देत आहोत. जाटमध्ये सनी देओल. सनी देओलला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माससाठीच्या उत्सवाची तयारी सुरू."
देशभक्तीपर भूमिका साकारण्यासाठी सनी देओल परिचित आहेत. हा चित्रपट अॅक्शन आणि इमोशन्स यांचे योग्य मिश्रण असणार आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षक लक्षवेधक व्हिज्युअल्सची अपेक्षा करू शकतात. सनी देओलबरोबरच्या कलाकारांमध्ये रणदीप हुड्डा, सैयामी खेर आणि रेजिना कॅसँड्रा सारख्या कसलेल्या कलाकारांचा समावेश आहे.
मैत्री मुव्हिड मेकर्स आणि पीपल मीडिया फॅक्टरी या बॅनरखाली जाट हा चित्रपट नवीन येरनेनी, वाय रविशंकर आणि टीजी विश्व प्रसाद बनवत आहेत. या चित्रपटाचा उद्देश उच्च निर्मिती मूल्यांसह भव्य कथाकथनाची जोड देण्याचा आहे. ऋषी पंजाबी यांचे सिनेमॅटोग्राफी आणि थमन एसचे स्कोर चित्रपटाचे आकर्षण आणखी वाढवणारे असू शकते. त्यामुळे प्रेक्षकांना एक रोमहर्षक सिनेमॅटिक अनुभव मिळेल.
या प्रकल्पाव्यतिरिक्त, सनी देओलकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. तो राजकुमार संतोषी यांच्या लाहोर 1947 या ऐतिहासिक ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खानच्या प्रॉडक्शनमार्फत केली जाणार आहे. आमिर खानबरोबरचा सनी देओलचा हा पहिलाच चित्रपट असेल. याशिवाय तो अनुराग सिंग दिग्दर्शित बॉर्डरच्या सिक्वेलमध्ये त्याच्या प्रतिष्ठित भूमिकेत परतणार आहे.