ETV Bharat / entertainment

सनी देओल आणि दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी मिळून साकारणारा 'बिग बजेट अ‍ॅक्शन' चित्रपट - Sunny Deol film - SUNNY DEOL FILM

Sunny Deol film : सनी देओल दक्षिणेकडे जाणाऱ्या नव्या बॉलिवूड अभिनेत्यांच्या यादीत सामील झाला आहे. त्याने टॉलिवूड दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांच्याबरोबर त्याचा पुढचा चित्रपट साइन केला आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असणार आहे.

Sunny Deol
सनी देओल ((ANI Image))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 20, 2024, 4:59 PM IST

मुंबई - Sunny Deol film : 'वीरा सिम्हा रेड्डी'च्या यशानंतर टॉलिवूड चित्रपट निर्माता गोपीचंद मालिनेनी यांनी सर्वांचं लक्ष वेधणारी बातमी दिली आहे. त्यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटात बॉलिवूडचा 'गदर' स्टार सनी देओल झळकणार आहे. या चित्रपटाचं तात्पुरतं शीर्षक 'SDGM' असं ठरवण्यात आलंय. मैत्री मुव्ही मेकर्स आणि पीपल मीडिया फॅक्टरी या दोन प्रॉडक्शन कंपन्यांनी या चित्रपटा निर्मितीसाठी सहकार्य केलं आहे.

निर्मात्यांनी या प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली आणि लवकरच शूटिंग सुरू होईल असं सांगितलं. त्यांच्या अधिकृत हँडलवर बातमी शेअर करताना, मैत्री मूव्ही मेकर्सने लिहिले: "देशातील सर्वात मोठ्या अ‍ॅक्शन फिल्मसाठीचा मार्ग तयार झाला आहे. 'SDGM' या चित्रपटामध्ये अ‍ॅक्शन सुपरस्टार सनी देओल मुख्य भूमिकेत असणार आहेत. गोपिचंद दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी मैत्री मुव्ही मेकर्स आणि पीपल मीडिया फॅक्टरी यांनी घेतली आहे. महाउत्सवाची तयारी सुरू झाली आहे! शूट लवकरच सुरू होईल. ."

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या संगीतासाठी थमनची निवड करण्यात आली आहे, ऋषी पंजाबी यांनी सिनेमॅटोग्राफी हाताळली आहे आणि अविनाश कोल्ला हे प्रोडक्शन डिझाइनचे व्यवस्थापन करतील अशी अपेक्षा आहे. याआधी, गोपिचंद मालिनीने अभिनेता रवी तेजा बरोबर एका प्रकल्पाची घोषणा केली होती, मात्र, विविध कारणांमुळे तो रद्द करण्यात आला होता. आता, चाहते या बिग-बजेट चित्रपटासाठी उत्सुक आहेत, येत्या काही दिवसांत आणखी बरेच तपशील उघड होण्याची अपेक्षा आहे.

अनेक बॉलिवूड दिग्गज कलाकार दक्षिणेकडील दिग्दर्शकांकडे वळल्यानंतर अनेक पॅन इंडिया चित्रपटांची निर्मिती झाली आहे. सनी देओलच्या आधी शाहरुख खान दिग्दर्शक एटली बरोबर 'जवान'मध्ये सामील झाला होता, सलमान खान 'सिकंदर'मध्ये ए आर मुरुगोडोस बरोबर काम करत आहे आणि अमिताभ बच्चन नाग अश्विन बरोबर 'कल्की 2898 एडी' चित्रपटाचं सध्या प्रमोशन करत आहे.

हेही वाचा -

मुलगी सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात शत्रुघ्न सिन्हा हजर राहणार की नाही? "खामोश..." म्हणत केला खुलासा - Sonakshi Sinha wedding

कमल हासन आणि दीपिका पदुकोण 'कल्की 2898 एडी'च्या प्री-रिलीज कार्यक्रमात हजर - kamal haasan

अचानक थिएटरमध्ये पोहोचला कार्तिक आर्यन, बच्चे कंपनीच्या डोळ्यात आनंदाश्रू - पाहा व्हिडिओ - Chandu Champion show

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.