ETV Bharat / entertainment

सनी देओल साऊथ डेब्यू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र, आलिशान कारसह व्हिडिओ केला शेअर - SDGM Shoot - SDGM SHOOT

Sunny Deol : सनी देओल हैदराबादमध्ये त्याच्या साऊथ डेब्यू चित्रपट 'एसडीजीएम' (SDGM) च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. शूटिंगदरम्यान, सनीनं हैदराबादमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये तो त्याच्या आलिशान कारमध्ये प्रवास करताना दिसत आहे.

Sunny Deol
सनी देओल (सनी देओल (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2024, 5:08 PM IST

मुंबई -Sunny Deol New Movie: 'गदर 2'च्या यशानंतर सनी देओलला आता अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. यामध्ये 'बॉर्डर 2' आणि 'लाहोर 1947' या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय सनी देओल 'सफर' या चित्रपटात काम करत आहे. तसंच त्यानं साऊथ चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. सध्या सनी देओल त्याच्या साऊथ डेब्यू चित्रपटाच्या तयारीत आहे. बॉलिवूडच्या 'तारा सिंह'नं यासंदर्भात एक व्हिडिओ 29 ऑगस्ट रोजी सकाळी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो हैदराबादमध्ये शूटिंगचा आनंद घेताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तो त्याच्या आलिशान कारसह दिसत आहे.

'एसडीजीएम' (SDGM) शूटिंग हैदराबादमध्ये सुरू : यावेळी त्याचा लूक कॅज्युअल असून, त्याचा स्टाईलिश अंदाज हा अनेकांना आवडला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सनीनं यावर कॅप्शनमध्ये लिहिलं, "हैदराबादमध्ये प्रवास आणि शूटिंगचा आनंद लुटत आहे." 20 जून रोजी सनीनं त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करून गोपीचंद मलिनेनी यांच्या 'एसडीजीएम' (SDGM) या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सनी आता हैदराबादमध्ये आहे. अल्लू अर्जुन स्टारर मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा'चे निर्माते (मैत्री मुव्हीज) द्वारे 'एसडीजीएम' चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटाचे निर्माते नवीन येर्ननी, वाई रवि शंकर, टीजी विश्व प्रसाद, ऋषि पंजाबी, अविनाश कोला चेरी हे आहेत.

'एसडीजीएम' (SDGM)मध्ये 'या' अभिनेत्री दिसणार : या चित्रपटाला एस थमन हे संगीत देणार आहे. 'एसडीजीएम' हा ॲक्शन चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी पूजा समारंभ 20 जून रोजी आयोजित करण्यात आला होता. 'एसडीजीएम' चित्रपटात 'घूमर' फेम अभिनेत्री सैयामी खैर आणि साऊथ चित्रपटांमध्ये सक्रिय असलेली अभिनेत्री रेजिना कैसेंड्रा मुख्य भूमिकेत असणार आहे. 22 जूनपासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे. दरम्यान सनी देओलचा आगामी चित्रपट 'लाहोर 1947'चं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे केली जात आहे.

हेही वाचा :

  1. मेघना गुलजारच्या चित्रपटापाठोपाठ आयुष्मान खुराना सनी देओलच्या चित्रपटातून पडला बाहेर - Ayushmann Khurrana
  2. सनी देओल आणि अमिषा पटेल अभिनीत 'गदर 2' पुन्हा एकदा होईल रिलीज - Gadar 2
  3. "स्वप्न खरं झालं": गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित चित्रपटात सनी देओलबरोबर भूमिका साकारणार सैयामी खेर - Saiyami Kher

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.