ETV Bharat / entertainment

सोनाक्षी सिन्हानं कामाला सुट्टी न देता शूटिंग सेटवरच साजरा केला वाढदिवस - Sonakshi Sinha - SONAKSHI SINHA

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं अलिकडेच तिचा वाढदिवस साजरा केला. पण यावेळी तिचा वाढदिवस वेगळा असल्यानं तिनं कामातून सुट्टी न घेता सेटवरच वाढदिवस साजरा केला.

Sonakshi Sinha
सोनाक्षी सिन्हा (सोनाक्षी सिन्हा (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 5:14 PM IST

मुंबई - सोनाक्षी सिन्हानं तिच्या अलिकडेच साजरा केलेल्या वाढदिवसाच्या फोटोंची मालिका सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये तिनं चाहत्यांचे आणि प्रेम करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. २ जून रोजी सोनाक्षीनं तिचा वाढदिवस साजरा केला. यासाठी तिला सेलिब्रिटी, मित्र, कुटुंब आणि चाहत्यांकडून खूप शुभेच्छा आणि प्रेम मिळालं. हा दिवस तिच्यासाठी का खास होता याचा खुलासाही तिनं केला आहे.

सोनाक्षीनं सेटवर हजर राहून घेतला सुट्टीचा आनंद

फोटोंची मालिका शेअर करताना सोनाक्षीनं लिहिलं की, "मी सहसा माझ्या वाढदिवसाला कामावरून सुट्टी घेते आणि कुठेतरी जाते. पण 7 वर्षांनंतर मी सेटवर परतले आहे आणि मला आठवलं की आपल्याला जे आवडतं ते काम करण्यात सुट्टीचा वेळ घालवावा. त्यामुळे सेटवर माझा वेळ आनंदात गेला. माझ्या टीमनं हा दिवस माझ्यासाठी खूप खास बनवल्याबद्दल धन्यवाद आणि ज्यांनी मला ऑनलाइन शुभेच्छा पाठवल्या त्या प्रत्येकाचं आभार... तुमचे प्रेम माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. जरी मी तुमच्या शुभेच्छा पुन्हा पोस्ट केल्या नसल्या तरी वाढदिवसाच्या दिवशी मी कामावर होते हे तुम्ही पाहू शकता.

सोनाक्षी सिन्हाचा कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बालनं तिच्या वाढदिवसाच्या निमित्तां सुंदर पद्धतीनं शुभेच्छा दिल्या. इन्स्टाग्रामवर सोनाक्षी सिन्हाबरोबरचे स्वतःचे न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, सोनाक्षी सिन्हा तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या मालिकेच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या मालिकेतील फरीदानच्या भूमिकेसाठी सोनाक्षीचं खूप कौतुक झालं. नुकताच 'हिरामंडी'चा पुढील हंगाम अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये आदित्य सरपोतदारचा 'काकुडा', रॉनी स्क्रूवाला दिग्दर्शित हॉरर-कॉमेडी चित्रपट ज्यामध्ये साकिब सलीम आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय तिच्या हाती निकिता रॉय आणि द बुक ऑफ डार्कनेस यांचाही समावेश आहे.

हेही वाचा -

'बिग बॉस ओटीटी 3'चा नवीन होस्ट अनिल कपूरचा फर्स्ट लूक रिलीज - anil kapoor first look

'मुंज्या'मध्ये कटप्पा उर्फ सत्यराजचे समर्पण आणि प्रतिभा पाहून शर्वरी वाघ झाली आश्चर्यचकित - Sharwari Vagh

अर्जुन कपूरनं मलायकाबरोबर विभक्त होण्याच्या अफवांदरम्यान केला धक्कादायक फोटो शेअर - arjun kapoor

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.