ETV Bharat / entertainment

गायिका नंदिनी श्रीकर यांनी ‘उनाड’ चित्रपटासाठी साधली सुरेल हॅट्रिक - Singer Nandini Srikar - SINGER NANDINI SRIKAR

Singer Nandini Srikar : गायिका नंदिनी श्रीकर यांनी 'उनाड' चित्रपटासाठी सलग तीन महत्त्वाचे पुरस्कार मिळवत सुरेल हॅट्रिक साधली आहे. यंदाचा फिल्मफेअर, झी चित्रपट गौरव, मटा सन्मान अशा मानांच्या पुरस्कारावर तिनं आजवर आपलं नाव कोरलं आहे.

Singer Nandini Srikar
गायिका नंदिनी श्रीकर (Nandini Srikar PR team)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 3:45 PM IST

मुंबई - Singer Nandini Srikar : आपल्या मधुर स्वरांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी हिंदी चित्रपटसृष्टीतील गायिका नंदिनी श्रीकर यांनी ‘उनाड’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने सुरेल हॅट्रिक साधली आहे. या चित्रपटातील ‘क्षण काळचे’ या गाण्यासाठी यंदाचा फिल्मफेअर, झी चित्रपट गौरव, मटा सन्मान असे तीन अतिशय मानाचे पुरस्कार पटकावत तिनं आपली छाप पाडली आहे. या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंदिनी यांनी म्हटलंय की, आपल्या कामाला प्रेक्षकांची पोचपावती मिळणं आवश्यक आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने मला ती मिळाली आहे. मला ‘उनाड’ च्या टीमने ही संधी दिल्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे.

Singer Nandini Srikar
नंदिनी श्रीकर (Nandini Srikar PR team)

दक्षिण भारतीय कुटुंबात जन्मलेल्या पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या नंदिनी श्रीकरना लहानपणापासून संगीताची आवड होती. आयटी क्षेत्रात नोकरी करत असताना १९९७ साली संगीतकार हरिहरन यांची भेट झाली. नंदिनी यांचा सुरेख आवाज ऐकून हरिहरन यांनी नंदिनीची शिफारस विद्यासागर यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांचा बॉलीवूडचा प्रवास सुरु झाला. त्रिलोक गुर्टू , रणजीत बारोट अशा दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी त्यामुळे मिळाली. आयटीतल्या जॉबमुळे तंत्रज्ञानाचा सुरेख उपयोग करत संगीतातही नंदिनी यांनी वेगवेगळे प्रयोग केले. कॉफी आणि एअरलाइन्सच्या जाहिरातींसाठी त्यांनी अनेक जिंगल्स तयार केल्या. त्यानंतर अनेक चित्रपटांसाठी उत्तम काम करण्याची संधी मिळत गेली.

Singer Nandini Srikar
नंदिनी श्रीकर (Nandini Srikar PR team)

कर्नाटक, हिंदुस्थानी आणि पाश्चात्य संगीत या सगळ्या प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या नंदिनी श्रीकर यांनी ‘उनाड’ च्या निमित्ताने मराठी चित्रपटातही आपल्या आवाजाच्या गोडव्याने आपला वेगळेपणा सिद्ध करून दाखवला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेता (पदार्पण), छायांकन, गीतकार, पार्श्वसंगीत या विभागासाठी ही पाच फिल्मफेअर पुरस्कार घोषित झाले आहेत.

Singer Nandini Srikar
नंदिनी श्रीकर (Nandini Srikar PR team)

अर्थ क्रिएशन, ऑरोरा प्रोडक्शन आणि नम्रता आर्ट्सच्या बॅनरखाली चंद्रेश भानुशाली, अजित अरोरा व प्रीतेश ठाकूर यांनी 'उनाड' चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांचं आहे. आशितोष गायकवाड, हेमंल इंगळे, देविका दफ्तरदार, देवेंद्र पेम या कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

हेही वाचा -

  1. अमिताभ आणि रजनीकांतने सुरू केले 'वेट्टियाँ'चे शूटिंग, 'बिग बी'सह 'थलैयवा' ३३ वर्षांनंतर एकत्र - Thalaiyava with Big B
  2. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या कलाकारांची गुरचरण सिंग बेपत्ता प्रकरणी होणार चौकशी - gurucharan singh missing case
  3. निक जोनासची प्रकृती चिंताजनक, व्हिडिओ शेअर करून चाहत्यांची मागितली माफी... - nick jonas apologises to fans

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.