ETV Bharat / entertainment

Shweta Bachchan : श्वेता बच्चनच्या वाढदिवसाच्या पार्टीत ऐश्वर्या आणि अभिषेक बेपत्ता - Aishwarya abhishek

Shweta Bachchan : श्वेता बच्चनचा काल 17 मार्च रोजी वाढदिवस झाला. तिनं वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीत अनेक सेलिब्रिटी हजर होते, मात्र यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेक बेपत्ता होते.

Shweta Bachchan
श्वेता बच्चन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 2:38 PM IST

मुंबई - Shweta Bachchan : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चननं 17 मार्च रोजी आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. श्वेतानं तिच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त तिच्या घरी एका भव्य पार्टीचं आयोजित केलं होतं. श्वेतानं आयोजित केलेल्या पार्टीत अनेक हिंदी चित्रपटसृष्टीचे कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र या खास प्रसंगी श्वेताची वहिनी ऐश्वर्या राय , भाची आराध्या आणि भाऊ अभिषेक कुठेही दिसले नाहीत. आता पुन्हा एक सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे की ऐश्वर्या आणि श्वेता यांच्यात काही ठीक नाही. ऐश्वर्यानं श्वेताला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील सोशल मीडियाद्वारे दिल्या नाहीत. दरम्यान या पार्टीमध्ये जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हजर होते.

श्वेता बच्चनच्या पार्टीमधील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल : श्वेताची वाढदिवसाची पार्टी जलसा बंगल्यावर करण्यात आली होती. या पार्टीमधील जया आणि अमिताभ बच्चनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. श्वेताची मुलगी नव्या नवेली नंदानं कथित बॉयफ्रेंड सिद्धांत चतुर्वेदीला तिच्या आईच्या वाढदिवसाच्या पार्टीला आमंत्रित केलं होतं. श्वेताच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावल्यानंतर सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नंदा यांच्या अफेअरच्या अफवेलाही जोर आला आहे. सिद्धांत आणि नव्या अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याला दुजोरा दिलेला नाही.

'या' सेलिब्रिटींनी लावली हजेरी : या पार्टीमध्ये शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान, पत्नी गौरी खान, मुलगा आर्यन खाननं हजेरी लावली होती. सुहानानं श्वेताचा मुलगा अगस्त्य नंदाबरोबर 'द आर्चिज' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. या चित्रपटादरम्यान त्यांच्या अफेअरच्या अनेक अफवा पसरल्या होत्या. याशिवाय या पार्टीत अभिनेत्री अनन्या पांडे, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, सीमा खान, सुजैन खान, महीप कपूर, करण जोहर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी श्वेताच्या पार्टीत उपस्थित होते. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं या पार्टीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा :

  1. Tamannaah Bhatia Vijay Varma : मनीष मल्होत्राच्या 'उल जलूल इश्क'च्या पार्टीत तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लावली हजेरी
  2. Crew trailer launch : 'क्रूू'च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी करीना कपूर खान झाली नाराज!
  3. Karan and Farah : फराह खाननं करण जोहरच्या आलिशान बेडरूम आणि वॉर्डरोब कलेक्शनचा व्हिडिओ केला शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.