ETV Bharat / entertainment

'कंतारा : चॅप्टर 1 'च्या सेटवर भीषण अपघात, 6 कलाकार जखमी, ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाचं शूटिंग थांबलं

चित्रपटाच्या सेटवर बसला अपघात झाल्यामुळे ऋषभ शेट्टीच्या 'कंतारा: चॅप्टर 1'चे शूटिंग थांबवण्यात आलं आहे.

Shooting of Rishabh Shetty's film halted
'कंतारा : चॅप्टर 1 'च्या सेटवर अपघात (( Etv Bharat /Film Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 3 hours ago

मुंबई - 2022 मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'कंतारा' चित्रपटाचा प्रीक्वेल बनत आहे. 'कंतारा: चॅप्टर 1' या शीर्षकासह या चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरू आहे. या चित्रपटाच्या सेटवर अपघात झाल्यानं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. खरतंर चित्रपट कलाकार प्रवास करत असलेल्या बसला अपघात झाला, यामध्ये 6 ज्युनियर कलाकार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील जडकलजवळ रविवारी रात्री उशिरा घडली. ऋषभ शेट्टी मुख्य भूमिका साकारत असलेल्या या चित्रपटातील 20 ज्युनियर कलाकारांना घेऊन जाणारी मिनी बस मुदूर येथे शूटिंगवरून परतत असताना उलटली. यामध्ये 6 कलाकार गंभीर जखमी झाले आहेत.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटर सायकलला होणारी टक्कर वाचवण्याच्या प्रयत्नात मिनी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरून खाली गेली. त्यामुळे कलाकारांना कोल्लूर येथील त्यांच्या निवासस्थानी घेऊन जाणारी बस उलटली. त्यानंतर आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचली आणि प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना जवळच्या कुंदापूर आणि जडकल येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. सहा कलाकारांना गंभीर दुखापत झाली असून त्यापैकी काहींना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

या बसमधून प्रवास करणारे बाकीचे कलाकार सुरक्षित असले तरी या घटनेने घटनास्थळी तणाव निर्माण झाला आणि काही कलाकारांनी बस चालकावर निष्काळजीपणाचा आरोप केला आणि दावा केला की तो गाडी चालवताना मोबाईल फोन वापरत होता. यामुळे काही कलाकार संतप्त झाले आणि त्यांनी ड्रायव्हरशी वाद करून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिस येण्यापूर्वीच घटनास्थळी हा गोंधळ उडाला होता.

'कंतारा: चॅप्टर १' चित्रपटाचे थांबले शूटिंग - जखमी कलाकारांवर जडकल महालक्ष्मी क्लिनिक आणि कुंदापूर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू असून, प्रॉडक्शन टीमने परिस्थिती पाहता चित्रपटाचे शूटिंग सध्या थांबवले आहे. कोल्लूर पोलिसांनी अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कंतारा: चॅप्टर १' मध्ये जयराम आणि जिशू सेनगुप्ता यांच्याही भूमिका आहेत. कंतारा चित्रपटाच्या हा प्रीक्वेल 2 ऑक्टोबर 2025 रोजी रिलीज होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.