ETV Bharat / entertainment

'गँग्स ऑफ गाझियाबाद' वेब सीरिजमधून शत्रुघ्न सिन्हा करणार ओटीटीवर पदार्पण - शत्रुघ्न सिन्हा

Shatrughan Sinha Digital Debut: शत्रुघ्न सिन्हा डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'गँग्स ऑफ गाझियाबाद' या वेब सीरिजमधून पदार्पण करत आहे. त्यांनी आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Shatrughan Sinha Digital Debut
शत्रुघ्न सिन्हा करणार ओटीटीवर पदार्पण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 5:01 PM IST

मुंबई - Shatrughan Sinha Digital Debut: ज्येष्ठ अभिनेता शत्रुघ्न सिन्हा त्याच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'गँग्स ऑफ गाझियाबाद' या आगामी वेब सीरिजमधून पदार्पण करणार आहेत. या वेब सीरीजमध्ये त्यांची कडक स्टाईल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शत्रुघ्न सिन्हा शेवटी 'यमला पगला दीवाना: फिर से'मध्ये दिसले होते. आता डिजिटलवर दिसणार असल्यानं त्याचे चाहते खूप खूश आहेत. सोशल मीडियावर अनेकजण 'गँग्स ऑफ गाझियाबाद'च्या व्हायरल झालेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. शत्रुघ्न सिन्हा या वेब सीरीजमध्ये आपल्या अनोख्या अंदाजामध्ये दिसणार आहे.

'गँग्स ऑफ गाझियाबाद' पहिली झलक : शत्रुघ्न सिन्हा यांनी 7 मार्च रोजी 'गँग्स ऑफ गाझियाबाद' ची पहिली झलक शेअर करत पोस्टमध्ये लिहिलं, ''दिग्दर्शक नागेंद्र चौधरी, प्रतिभावान आणि मेहनती अभिनेते प्रदीप नागर, जतीन सरना, आशुतोष राणा, अभिमन्यू सिंग, मुकेश तिवारी, प्रतिभावान, होनहार माहिरा शर्मा आणि सर्व कलाकारांच्या समर्पण अनुभवाबरोबर काम करणं, हा एक संस्मरणीय अनुभव होता.'' याशिवाय त्यांनी पुढं लिहिलं, ''गाझियाबादच्या ओटीटी गँग्सवरील माझ्या पहिल्यावेब सीरीजचा फर्स्ट लूक शेअर करत आहे. ही वेब सीरीज विनय कुमार आणि प्रदीप नागर निर्मित आणि नागेंद्र चौधरी दिग्दर्शित आहे. या वेब सीरीजमध्ये 90 च्या दशकातील किरकोळ अंडरवर्ल्डचा परतीचा प्रवास असणार आहे.''

शत्रुघ्न सिन्हा शेअर केली पोस्ट : शत्रुघ्न सिन्हाच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करून त्यांना त्याच्या आगामी वेब सीरीजसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. एका चाहत्यांना या पोस्टवर लिहिलं, ''सर मी तुम्हाला एका वेगळ्या अंदाजात पाहायला खूप उत्सुक आहे. दुसऱ्या एकानं लिहिलं, ''गँग्स ऑफ गाझियाबाद' ही वेब सीरीज खूप सुंदर असणार आहे.'' आणखी एकानं लिहिलं, सर तुम्ही प्रत्येक चित्रपटांमध्ये सुंदर दिसता.'' याशिवाय या पोस्टवर काहीजण हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

हेही वाचा :

  1. आदिल खान दुर्राणीनं 'बिग बॉस 12' फेम स्पर्धकाशी केलं लग्न
  2. 'कॉस्मेटिक सर्जरीपासून सावध रहा' : महिला दिनाच्या आधी 'आशिकी' फेम अनु अग्रवालचा खास संदेश
  3. 'नाटू नाटू' गाण्यावर रामचरणसह क्रिकेटच्या मैदानात नाचला सचिन तेंडुलकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.