ETV Bharat / entertainment

शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ, रक्षकांच्या गराड्यात किंग खान विमानतळावर दिसला - पाहा व्हिडिओ - Shah Rukh Khan - SHAH RUKH KHAN

Shah Rukh Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मोठ्या बंदोबस्तात शाहरुख खान विमानतळावर घरी परतताना दिसला. पाहा व्हायरल झालेला व्हिडिओ...

Shah Rukh Khan
शाहरुख खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 10:13 AM IST

मुंबई - Shah Rukh Khan : सलमान खान राहात असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबारानंतर सुरक्षेच्या चिंता वाढल्या आहेत. गोळीबार करुन फरार झालेल्या तरुणांना पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं असून त्यांचा कसून तपास केला जात आहे. दरम्यान, बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या सुरक्षा कवचामध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत आपल्या क्रिकेट संघाला पाठिंबा देण्यासाठी चार दिवस कोलकाता येथे असलेला किंग खान बुधवारी रात्री उशिरा कडक सुरक्षेत शहरातून बाहेर पडताना दिसला.

सुपरस्टार शाहरुख खानच्या चाहत्यांनी त्याचे लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फॅन्स क्लबने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, किंग खान बुधवारी रात्री उशिरा कोलकाताहून मुंबईला निघताना आर्म गार्ड्स, पोलीस आणि विमानतळ सुरक्षा यांच्या बंदोबस्तात विमानतळाच्या आत जाताना दिसत होता.

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. यापूर्वीच सलमानला सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. त्याला काही महिन्यांपासून सातत्यानं जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत. त्यामुळे सध्याच्या घटनेनंतर सर्व महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत सरकार सजग झाले आहे. सलमानच्या घरी जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची भेट घेतली व काळजी न करण्याचा सल्ला दिला.

दरम्यान शाहरुख खानच्या सुरक्षा व्यवस्थेतही वाढ झाल्याचं कालच्या प्रसंगावरुन दिसतं. त्याच्या 'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनापासून त्याला धमकी देण्याचं सत्र सुरू झालं होतं. त्यानंतर 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' हे सलग तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. त्यामुळं त्याला आणखी काही धमकीचे कॉल येत राहिले. त्यानंतर महाराष्ट्राच्या गृह विभागानं वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अँटी टेरेरिझम स्कॉडला पत्र लिहून शाहरुखला जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचं कळवलं होतं. त्यानंतर त्याला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती.

हेही वाचा -

  1. दहशत निर्माण करण्यासाठी सलमानच्या घरावर गोळीबार, बिहारमध्येच रचला होता गोळीबाराचा कट; चौकशीत धक्कादायक खुलासे - Salman Khan House Firing
  2. आराध्या बच्चनबद्दल आत्येबहीण नव्या नवेलीची भन्नाट प्रतिक्रिया, पॉडकास्टमध्ये केलं नव्या पिढीचं गुपित उघड... - Navya Nanda talk about Aaradhya
  3. वरुण धवनसह सामंथानं दिले 'सिटाडेल: हनी बनी' रिलीजचे संकेत - Varun Dhawan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.